महापालिकेतर्फेशहरात वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:32 AM2019-07-02T00:32:37+5:302019-07-02T00:33:01+5:30

येथील प्रभाग क्रमांक २५ मधील उंटवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते वृृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

 Amazing tree plantation campaign in the municipal corporation | महापालिकेतर्फेशहरात वृक्षारोपण मोहीम

महापालिकेतर्फेशहरात वृक्षारोपण मोहीम

Next

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २५ मधील उंटवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते वृृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरवले असून, त्याअंतर्गत नाशिक महापालिकेला ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उपक्र माची सुरु वात सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील उंटवाडी परिसरातून सोमवारी (दि.१) करण्यात आली.
महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पिंपळ, सिसम, आपटे, कडूनिंब आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी मनपा सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, मनपा माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक श्यामकुमार साबळे, मनपा उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत, सिडको विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, उद्यान विभागाचे शिवाजी आमले, अमर निकम, बी. आर. हांडोरे, सुनील निकम, राकेश ढोमसे, पवन
मटाले, विजय नेरकर आदी उपस्थित होते.

Web Title:  Amazing tree plantation campaign in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.