आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:04 AM2018-02-02T01:04:20+5:302018-02-02T01:05:42+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.

Allow us to be happy | आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

Next
ठळक मुद्दे ग्रामसभेत ठरावसमृद्धीबाधितांची राष्ट्रपतींकडे मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळापासून इगतपुरी तालुक्याने खूपच यातना सोसून राष्ट्राच्या हितावह जमिनी देण्याचं काम करून विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हा कधीही विकासविरोधी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनी महत्त्वकांक्षी केलेल्या समृद्धी प्रकल्पात शासनाने संपादन केलेल्या जमिनी जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अनेक महिन्यांपासून आंदोलन करत या प्रकल्पाला कधी नव्हे इतका विरोध तालुक्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे हा विरोध राजकीय नसून सर्व तरुण शेतकरी मिळून करत आहेत. या ग्रामसभेत दौलत दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, गोरख हाडके, दादा कडू, हरिश्चंद्र दुभाषे, मुरलीधर दुभाषे, तुकाराम कडू, शिवराम कडू, प्रकाश कडू, कैलास दुभाषे, निवृत्ती दुभाषे, सखाराम दुभाषे, मदन बिन्नर, ज्ञानेश्वर कडू, कारभारी दुभाषे इत्यादी शेतकºयांनी ठरावावर सह्या केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शासनस्तरावर भांडत असून, आमची प्रामाणिक इच्छा आहे की, सरकारने हा प्रकल्प जरूर करावा मात्र तो भूसंपादन २०१३नुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून. परंतु शासन मात्र हे करताना दिसत नाही व शेतकºयांमध्ये बुद्धिभेद करून आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेत आहे. ज्या अवचितवाडी गावात रेडीरेकनरच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे तर प्रचलित बाजारभाव एक कोटी रुपये असताना सर्वात कमी दर देऊन जर जमिनी घेण्यात येणार असतील तर त्यापेक्षा मरण पत्करू; परंतु जमिनी देणार नाही.
- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धीबाधित संघर्ष समिती, इगतपुरी

Web Title: Allow us to be happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.