घोरवड येथे कृषी शाळा व खरीपपूर्व चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:55 PM2019-06-18T17:55:22+5:302019-06-18T17:55:35+5:30

सिन्नर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील घोरवड येथे कृषी शाळा व खरीपपूर्व चर्चासत्र पार पडले.

Agricultural school and Kharif pre-seminar session in Gorakh | घोरवड येथे कृषी शाळा व खरीपपूर्व चर्चासत्र

घोरवड येथे कृषी शाळा व खरीपपूर्व चर्चासत्र

Next

सिन्नर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील घोरवड येथे कृषी शाळा व खरीपपूर्व चर्चासत्र पार पडले.
शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरले तर त्याची उगवण क्षमता किती आहे, त्याचे प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक बापूसाहेब शेंडगे यांनी करून दाखवत घरगुती बियाणांबाबत मार्गदर्शन केले. उसामध्ये दिसणाºया हुमनी किडीचा प्रादुर्भाव आता सोयाबिन आणि भुईमुगासारख्या पिंकांमध्येही होवू लागला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी, याचेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खताचा वापर केल्यास पिाची उत्पादन क्षमता १५-२० टक्यांनी वाढते. हे खत कसे तयार करावे व त्याचा वापर कसा करावा, याबाबत कृषी सहाय्यक कुसुम तांबे, महेश गरूड यांनी मार्गदर्शन केले. यापुढे १५ दिवसांनी घोरवड येथे कृशी शाळेचे आयोजन करण्यात येणार असून शेतीतील निरीक्षणे नोंदवून त्यावर करावयाच्या विविध उपाययोजनांवर या शाळेत मार्ग काढण्यात येणार आहे. कृषी सहाय्यक महेश गरूड यांनी प्रास्तविक केले. सरपंच रमेश हगवणे, नितीन हरणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Agricultural school and Kharif pre-seminar session in Gorakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी