काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:48 AM2018-09-23T00:48:39+5:302018-09-23T00:49:06+5:30

कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़

Activists in the city steal things from the break | काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय

काचा फोडून वस्तू चोरणारी  टोळी शहरात सक्रिय

Next

नाशिक : कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़ कार फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़  गंगापूररोड परिसरातील सावरकरनगरमधील रहिवासी जयंत पगारे व त्यांचे सहकारी चारुदत्त वाघ हे बुधवारी (दि़१९) मुंबई-आग्रा रोडवरील राजीवनगर परिसरात गेले होते़ त्यांनी आपल्या दोन्ही बोलेरो (एमएच ४६ एक्स ७७१८ व एमएच १५ सीटी ७९२९) वाहने ग्रॅण्ड रिओ हॉटेलजवळ पार्क केली होती़ चोरट्यांनी या दोन्ही वाहनांच्या काचा फोडून १२ हजार रुपयांचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप, दोन हजार रुपयांचे वायफाय डिव्हाइस, ३० हजार रुपयांचा डेल कंपनीचा लॅपटॉप, एक हजार ५०० रुपयांचा वायफाय डिव्हाइस व दहा हजार रुपयांचा आयफोन मोबाइल असा ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  इंदिरानगरमधील रहिवासी अर्जुन भालसिंग (रा. भक्तिधाम अपार्टमेंट, श्रद्धाविहार) हे बुधवारी (दि़१९) कॉलेज रोडच्या बिगबझारमागे असलेल्या एका मॅटर्निटी होममध्ये कामानिमित्त गेले होते़ त्यांनी पार्क केलेल्या वॅगनर कारची (एमएच १५ जीए ९५२२) काच फोडून चोरट्यांनी त्यातील तीस हजार रुपयांचे दागिने व दोन हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोच्या शिवाजी चौकातील रहिवासी अविनाश खैरनार हे बुधवारी (दि़१९) कामानिमित्त शहरात आले होते़ त्यांनी आपली बलेनो कार (एमएच १५ जीएफ ४७९०)गोल्फ क्लब ग्राउंडशेजारील बस स्टॉपजवळ पार्क केली होती़ चोरट्यांनी कारची काच फोडून त्यातील चाळीस हजार रुपयो किमतीचा लॅपटॉप चोरून नेला़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लॅपटॉपसह ऐवज लंपास
गंगापूररोडवरील रामेश्वरनगरमधील रहिवासी भूषण पाटील हे बुधवारी (दि़१९) सायंकाळी कामानिमित्त सीटी सेंटर मॉलला गेले होते़ त्यांनी आपली शेवरलेट कॅप्टिवा कार (एमएच १५, डीएस ४७७७) मॉलच्या बाजूच्या गल्लीत पार्क केली होती़ चोरट्यांनी या कारच्या काचा फोडून ५० हजार रुपये किमतीचा अ‍ॅप कंपनीचा लॅपटॉप, जळगाव जनता बँकेचे पासबुक व हार्डडीस्क असा ५२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Activists in the city steal things from the break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.