पिंपळगाव बसवंत उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 04:48 PM2019-01-17T16:48:39+5:302019-01-17T16:48:55+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील उंंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे राज्य उत्पादक शुल्क विभाग व दारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला माल शस्त्रशंचा धाक दाखवित वाहनासह पुन्हा पळविण्याचा प्रकार दारु बंदी विभागाच्या पथकाने हाणून पाडला.

Action taken by Pimpalgaon Basavant Excise Department | पिंपळगाव बसवंत उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पिंपळगाव बसवंत उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देदारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा माल जप्त

पिंपळगाव बसवंत : येथील उंंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे राज्य उत्पादक शुल्क विभाग व दारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला माल शस्त्रशंचा धाक दाखवित वाहनासह पुन्हा पळविण्याचा प्रकार दारु बंदी विभागाच्या पथकाने हाणून पाडला.
बुधवारी (दि.१६) नाशिक-देवळा रोडवरील खेलदरी ता.चांदवड भागात परराज्यातुन मद्याची विक्र ीकरण्याकरीता एक ट्रक येणार असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आयुक्त अश्विनी जोशी, सुनिल चव्हाण, प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपुत याच्या मार्गदर्शनाखाली साफळा रचत एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक (जी जे ३१ टी १५४९) अडवून तपासणी केली असता दमण राज्य निर्मीत रॉयल स्पेशल ओल्ड व्हिस्कीच्या १८० एम.एल.च्या २४००० बाटल्या, जॉन मार्टिन प्रिमीयर व्हिकि १८० एम.एल.च्या १९२० बाटल्या, किंगफिशर स्टॉग बियरचे १३८०० टिन तसेच टाटा ट्रक, एक स्विप्ट डिझायर (जी जे १५ सीजी ५७९९) असा सुमारे ६५ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी जावेद अल्लाऊद्दीन तेली (रा.नवापुर जि.नंदुरबार), अमर कैलास वर्मा (नवापुर ), राहुल राजु गायकवाड (रा. चिंचबन, पंचवटी, नासिक), शरद नारायण ठाकुर (रा. विजलपोर ता. जलालपोर. जि. नवसारी, गुजरात) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान हा जप्त केलेला माल नाशिक येथे आणत असताना मिलिंद मधुकर पवार (रा. चिचबन, मालेगाव स्टॅन्ड, नाशिक) व त्याचे चार सहकारी यांनी महिंद्रा झायलो गाडीतुन पिंपळगाव बसवंत येथील वणी उड्डाण पुलावर दुपारी तीनच्या सुमारास हा ट्रक अडविला आणि उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्रांचा धाक दाखवून ट्रकमधून उतरवून देत ट्रक पिंपळगाव बसवंत येथील सर्व्हिसराडने उंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे रस्ता न सापडल्याने अडखळला याच दरम्यान उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करीत सदरचा ट्रक पुन्हा ताब्यात घेत नाशिक येथे नेण्यात आला. या वेळी या भागात साध्या वेशातील अधिकारी, सरकारी वाहने यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. या कारवाईत उप आयुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक एम. बी. चव्हाण, देवदत्त पोटे, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दिपक आव्हाड, विठ्ठल हाके, सोन्याबापु माने, अमन तडवी, महेश सातपुते, गोरक्षनाथ आहिरे, संतोष कडलक, अवधुत पाटील, विजेंद्र चव्हाण, गणेश शेवगे, पांडुरंग वाईकर, सुनिल दिघोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(फोटो १७ पिंपळगाव बसवंत)

Web Title: Action taken by Pimpalgaon Basavant Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.