निफाड लोकन्यायालयात ९७१ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 06:24 PM2019-03-17T18:24:09+5:302019-03-17T18:24:44+5:30

निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ९७१ प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन ३१लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची वसुली झाली आहे.

971 cases disposed in Niphad civil court | निफाड लोकन्यायालयात ९७१ प्रकरणांचा निपटारा

लोकन्यायालयात समन्वयाने प्रकरणे मिटवितांना निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश १ आर जी वाघमारे, व समतिीचे सदस्य विकल पक्षकार न्यायालयीन कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्दे३१ लाख ४८ हजार रक्कमेची वसुली

लासलगाव: निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ९७१ प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन ३१लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची वसुली झाली
आहे.
न्यायालयात दाखल व वादपुर्व प्रकरणांत लोकन्यायालयात समजुतीने तोडगा काढण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निफाड न्यायालयात समन्वयासाठी निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश १ आर जी वाघमारे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एम एस कोचर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी एन गोसावी या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन समित्यांद्वारे कामकाजास प्रारंभ करण्यात आला. समित्यांवर सदस्य म्हणुन अ‍ॅड संजय दरेकर, सुनिल शेजवळ, अरविंद बडवर, भावना चोरिडया नानासाहेब केदार, आर. बि. गायकवाड आदी वकिलांचा समावेश करण्यातआला होता.
या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ट फौजदारी १४२ प्रकरणांपैकी २५ तर दिवाणी ८४ प्रकरणांपैकी ३५ असे एकुण६० प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली यातुन १३ लाख ६३ हजार ३२५ रु पयांची वसुली होऊन निकाली झाली तर न्यायालयात दाखलपुर्व विज वितरण कंपनीचे ग्रामपंचायत बँका पतसंस्थाचे १०९१९ प्रकरणांपैकी ९११ प्रकरणे निकाली समन्वयाने निकाली निघाली असुन त्यातुन १७ लाख ८५हजार ७५रु पयांची वसुली झाली आहे.
निफाड न्यायालयातील न्यायप्रविष्ट व वादपुर्व मिळुन ९७१ प्रकरणे निकाली निघाली त्याद्वारे एकुण ३१ लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची प्रकरणे आपसात समन्वयाने मिटली आहेत.
लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विधी सेवा समितिचे एस एम पवार अधीक्षक अनंत काशिकर सहा अधिक्षक एम एस कुलकर्णी एस पि शेलार गोकुळ शेळके, सि एस भानुवंशे दत्ता दळवी, एन .डि. कोथमिरे , वाय एस कुलकर्णी, आर एच नावाडकर ,एस एस सोनवणे , सुनिल नाईक, एस पि नेवगे, सोमनाथ बारे, श्रीमती मांजरे आदी न्यायालयीन कर्मचारी प्रयत्नशील होते.

Web Title: 971 cases disposed in Niphad civil court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.