९४ टक्के निकाल :पदविका अभ्यासक्रमात ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण उर्दू शिकण्याकडे बिगर उर्दू भाषिकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:10 AM2018-03-04T00:10:22+5:302018-03-04T00:10:22+5:30

नाशिक : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे.

9 4 percent result: 55 percent of the candidates in the diploma course have passed the Urdu Urdu Language | ९४ टक्के निकाल :पदविका अभ्यासक्रमात ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण उर्दू शिकण्याकडे बिगर उर्दू भाषिकांचा कल

९४ टक्के निकाल :पदविका अभ्यासक्रमात ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण उर्दू शिकण्याकडे बिगर उर्दू भाषिकांचा कल

googlenewsNext
ठळक मुद्देबिगर उर्दू भाषिकांचा टक्का अधिक अभ्यासक्रमाची १३वी बॅच सध्या सुरू

नाशिक : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे. भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्या भाषेची ओळख सर्वप्रथम गरजेची असते. मागील बारा वर्षांपासून शहरात उर्दू भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू असून, यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा टक्का अधिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत ५८ विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये २३ टक्के बिगर उर्दू भाषिकांचा समावेश आहे.
उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये उर्दू पदविका अभ्यासक्रम बारा वर्षांपासून शिकविला जात आहे. एकूण शंभर प्रवेश अर्ज या अभ्यासक्रमाच्या एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम शिकणाºया बाराव्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला. या बॅचमध्ये १०० विद्यार्थी होते; मात्र त्यापैकी ५८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले व त्यामधून ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. या अभ्यासक्रमाची १३वी बॅच सध्या सुरू असून, यामध्येही १०० विद्यार्थी उर्दूचे धडे गिरवित आहे. चौदाव्या बॅचची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली असून, १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ५४ विद्यार्थी बिगर उर्दू भाषिक आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली. बारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत उर्दू पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एक तपापासून अभ्यासक्रम अखंडितपणे चालविला जात आहे. सुरुवातीला काही बॅचमध्ये प्रवेशसंख्या कमी होती; मात्र या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसार होताच प्रवेशसंख्या वाढली आहे.

Web Title: 9 4 percent result: 55 percent of the candidates in the diploma course have passed the Urdu Urdu Language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा