नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:05 PM2018-05-28T15:05:02+5:302018-05-28T15:05:02+5:30

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता

6 lakh villages in Nashik division have scarcity shortage | नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

Next
ठळक मुद्दे२३७ टॅँकरने पाणी पुरवठा : जळगावला सर्वाधिक दाह

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून विहीरींनी तळ गाठण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत देखील आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, नाशिक विभागात ३० तालुक्यातील सुमारे सव्वा सहा लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ बसली असून, त्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाण्याची टंचाई जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली असून, त्यानंतर नाशिक व नगर जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने टॅँकरची संख्या वाढली आहे.
गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. शासनाने जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीच्या पाण्याची पातळी उंचावल्याची आकडेवारी जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात काही ठराविक भागातच पाण्याची पातळी वाढली तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक विभागातील ५२ तालुक्यापैकी ३० तालुक्यांना यंदा जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणी टंचाई भासू लागल्याने अगोदर शासकीय टॅँकरने त्यांची तहान भागवावी लागली त्यानंतर खासगी टॅँकर सुरू करण्यात आले. विभागात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ जळगाव जिल्ह्याला बसली असून, धामणगाव, यावल, रावेर व चोपडा हे चार तालुके वगळता ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील १२६ गावांना १०२ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यातही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात सर्वाधिक ३४ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड हे तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यातील ९६ गावे १३५ वाड्यांना ६७ टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यातील २ गावांना २ टॅँकर तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर वगळता अन्य तीन तालुक्यातील १८ गावांना १५ टॅँकर सुरू आहेत.

Web Title: 6 lakh villages in Nashik division have scarcity shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.