शिंदे कुटुंबीयांवर काळाचा घाला, पाण्यात बुडून घरातील 4 महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:04 PM2018-09-13T21:04:25+5:302018-09-13T21:05:39+5:30

शहरातील सातपूर परिसरात चौघांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. आज सकाळी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरात वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाल. त्यानंतर, दुपारी आपल्या सुनेसह लहान मुलींना घेऊन

4 women died after sunk in lake of nashik | शिंदे कुटुंबीयांवर काळाचा घाला, पाण्यात बुडून घरातील 4 महिलांचा मृत्यू

शिंदे कुटुंबीयांवर काळाचा घाला, पाण्यात बुडून घरातील 4 महिलांचा मृत्यू

Next

नाशिक : त्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच शिंदे कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन युवतींचा आणि एक महिलेचा समावेश आहे. या घटनेने नाशिकमध्ये शोककळा पसरली सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील सातपूर परिसरात चौघांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. आज सकाळी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरात वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाल. त्यानंतर, दुपारी आपल्या सुनेसह लहान मुलींना घेऊन कुटुंबातील मनिषा शिंदे या बंधाऱ्यावर भांडे घासण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी लहान मुलीचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी पाण्याचा अंदाज न आल्याने मनिषा शिंदे यांच्यासह त्यांची सून आणि इतर एक अशा चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ऐन गणेश चतुर्थीच्या सणादिवशीच शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनिषा शिंदे (40), वृषाली शिंदे (19), ऋतुजा शिंदे (16) आणि आरती शिंदे (28) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: 4 women died after sunk in lake of nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.