२८३३ चारित्र्य दाखल्यांचे वाटप

By admin | Published: February 3, 2017 01:31 AM2017-02-03T01:31:25+5:302017-02-03T01:31:39+5:30

मनपा निवडणूक : चारित्र्य पडताळणीसाठी इच्छुक उमेदवार पोलीस ठाण्यांत

2833 allotment of character certificates | २८३३ चारित्र्य दाखल्यांचे वाटप

२८३३ चारित्र्य दाखल्यांचे वाटप

Next

नाशिक : महापालिका निवडणूक अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला असून, अजूनही इच्छुक उमेदवारांची वर्तन व चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पोलीस आयुक्तालयात बघावयास मिळाले़
गुरुवार (दि़२) पर्यंत ३ हजार ६१६ इच्छुक उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते़ त्यापैकी २ हजार ८३३ उमेदवारांची चारित्र्य पडताळणी पूर्ण होऊन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे़ त्यामुळे शुक्रवारी (दि़ ३) त्यांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़
पोलीस आयुक्तालयातील वर्तन व चारित्र्य पडताळणी अर्जासाठी आॅनलाइन अर्ज करणे, त्यानंतर आलेल्या संदेशानुसार संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन माहिती देणे यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती़ (प्रतिनिधी)

Web Title: 2833 allotment of character certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.