मागील वर्षी  सुरू केलेल्या उपक्रमाची  २५७५ विद्यार्थ्यांनी  केली संकल्पपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:50 PM2018-01-24T23:50:14+5:302018-01-25T00:05:03+5:30

नाशिक येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कार : एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या एक कोटी सूर्यनमस्कार घालून मागील वर्षी याच दिवशी सुरू केलेल्या उपक्रमाची संकल्पपूर्ती बुधवारी (दि. २४) केली.

2575 students completed the program started last year! | मागील वर्षी  सुरू केलेल्या उपक्रमाची  २५७५ विद्यार्थ्यांनी  केली संकल्पपूर्ती!

मागील वर्षी  सुरू केलेल्या उपक्रमाची  २५७५ विद्यार्थ्यांनी  केली संकल्पपूर्ती!

Next

नांदगाव : नाशिक येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘सूर्यनमस्कार : एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या एक कोटी सूर्यनमस्कार घालून मागील वर्षी याच दिवशी सुरू केलेल्या उपक्रमाची संकल्पपूर्ती बुधवारी (दि. २४) केली.  यात नांदगाव संकुलातील व्ही.जे. हायस्कूल, मि. भि. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव माध्यमिक विद्यालय, सावरगाव, किसान माध्यमिक विद्यालय, वाखारी, सरस्वती विद्यामंदिर, मनमाड या शाळांमधील २५७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेजच्या मैदानावर सामूहिक सूर्यनमस्कार घालून एक जागतिक विक्रम स्थापित  केला.  या सोहळ्यास हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांनी स्वत: विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक केले. आपल्या मनोगतात त्यांनी आजच्या यांत्रिक युगात आजची पिढी व्यायामापासून दूर जात आहे. सरासरी आयुर्मान घटत चालले आहे. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगून त्यांनी अष्टांग योगाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षस्थानी नांदगाव संकुलाचे प्रमुख शशिकांत आंबेकर होते. प्रास्ताविक सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण यांनी केले.  संकल्पपूर्ती सोहळ्याचे शानदार उद्घाटन सर्व प्रमुख अतिथी व सर्व शाळांतील शालेय समिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नियोजन विजय चव्हाण, राहुल चिखले, वाल्मीक जाधव, सुनीता देवरे यांनी केले. सूत्रसंचालन वृषाली गढरी यांनी केले, तर आभार जयंत निकम यांनी मानले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह 
सूर्यनमस्कारप्रसंगी अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल धर्मेश यादव (शौर्यचक्र विजेते), नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, पोलीस निरीक्षक बशीर शेख, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजीव धामणे, टी.एम. बोर्ड, अध्यक्ष भय्यासाहेब चव्हाण, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. पटेल उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडियाचे अधिकारी उमेश गायधनी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक व शाळा प्रमुखांना देण्यात आले.

Web Title: 2575 students completed the program started last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.