जिल्हा परिषदेची निवडणूक आठवडाभरात जाहिर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:25 PM2019-07-22T12:25:48+5:302019-07-22T12:25:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीच्या राजकारणाची समीकरणे सुरु असतानाच अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा परिषद ...

Zilla Parishad elections will be announced in a week | जिल्हा परिषदेची निवडणूक आठवडाभरात जाहिर होणार

जिल्हा परिषदेची निवडणूक आठवडाभरात जाहिर होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे आगामी विधानसभा निवडणूकीच्या राजकारणाची समीकरणे सुरु असतानाच अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचीही लगबग सुरु झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वतरुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आह़े दरम्यान वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार आठवडय़ाभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता वर्तवली जात आह़े  
नंदुरबारसह धुळे, अकोला व वाशिम या चारही जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका:यांची मुदत सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाली आह़े या निवडणूकांसाठी गट-गणांची रचना तथा आरक्षणाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आह़े मतदार याद्या व त्यावरील हरकतींचे कामही पूर्ण झाले आह़े तथापि आरक्षणाच्या मुद्यावर काही कार्यकर्ते न्यायालयात गेल्याने निवडणूकांना स्थगिती मिळाली होती़ त्यानंतर राज्यशासनाने या मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान पदाधिका:यांनाच मुदतवाढ दिली होती़ एकवेळा मुदत संपल्यानंतर पुन्हा दुस:यांदा मुदतवाढ देण्यात आली होती़ तथापि धडगाव पंचायत समितीच्या एका हरकती संदर्भात येथील कार्यकर्ता थेट सर्वोच्च न्यायालयार्पयत गेल्याने ही बाब सर्वोच्च न्यायालयासमोर आली़ त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाला मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर तातडीने प्रशासक नेमावे लागल़े त्याचबरोबर 30 दिवसाच्या आत निवडणूकाही घ्याव्या लागणार आहेत़ त्यादृष्टीने प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरु केली आह़े राज्य निवडणूक आयोगानेही निवडणूक घेण्यासंदर्भात तयारी सुरु केल्याचे बोलले जात आह़े यासंदर्भात सूत्रांशी संपर्क साधले असता त्यांनी येत्या आठ ते 10 दिवसाच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता बोलून दाखवली आह़े 
सध्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीबाबत राजकीय हालचाली पूर्णपणे थांबल्या होत्या़ सर्वानाच विधानसभा निवडणूकीनंतर या निवडणूका होतील असे वाटत होत़े परंतू अचानक सर्वोच्च न्यायालयाचा आदेशामुळे निवडणूका लवकरच होणार असल्याने सर्वच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत़ एकीकडे विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक असलेल्या दुस:या फळीतील कार्यकत्र्याची मात्र चांगलीच गोची झाली आह़े 
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता असून विरोधी गटात सर्वाधिक संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आह़े परंतू राजकारणाच्या ध्रुवीकरणात आता कोण कुठल्या पक्षाकडे राहतील याचीच चर्चा आहे तर नवीन इच्छुक कार्यकत्र्यामध्येही कुठल्या पक्षाचा ङोंडा हाती घ्यावा, याबाबत संभ्रम आह़े 

आगामी विधानसभेच्या निवडणूका येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत़ मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 30 दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत़ त्यामुळे या निवडणूका विधानसभा निवडणूकीपूर्वीच घ्याव्या लागणार आहेत़ या संदर्भात एका वरिष्ठ अधिका:याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, निवडणूक घेण्यासंदर्भातील सर्व तयारी यापूर्वीच झाली आह़े त्यामुळे केवळ निवडणूक कार्यक्रम जाहिर करुन प्रक्रिया राबवावी लागणार आह़े साधारणत: आठवडाभरात त्यासाठी प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आह़े 
 

Web Title: Zilla Parishad elections will be announced in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.