नंदुरबारात ठिकठिकाणी तुळशी विवाह उत्साहात, विठुरायांची पालखीत मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:21 PM2017-11-01T13:21:04+5:302017-11-01T13:21:04+5:30

Tulshi marriages in Nandurbar, most prominent procession of Vitthuran | नंदुरबारात ठिकठिकाणी तुळशी विवाह उत्साहात, विठुरायांची पालखीत मिरवणूक

नंदुरबारात ठिकठिकाणी तुळशी विवाह उत्साहात, विठुरायांची पालखीत मिरवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/रांझणी : प्रबोधिनी एकादशीनिमित्त नंदुरबार शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े यात सायंकाळी तुळशी विवाह, विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक आदींचा समावेश होता़
सकाळी नंदुरबार येथील विठ्ठल मंदिरात पुरोहितांकडून काकड आरती, अखंड हरिनाम जप, होमहवन आदी विविध कार्यक्रम घेण्यात आल़े सकाळी पाच             वाजता विठ्ठल मंदिरात काकड आरतीला सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर अभिषेक होऊन महापूजा करण्यात आली़  या वेळी शहरातील मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होत़े मोठी एकादशी असल्याने भाविकांकडून सकाळीच मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्यात आली होती़ 
शहरातून पालखी सोहळ्याचे आयोजन 
प्रबोधिनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरातर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत़े पालखीत विठुरायाची प्रतिमा ठेवण्यात आली होती़ आकर्षक पध्दतीने पालखी सजविण्यात   आली होती़ लक्ष्मीनगर, भुनेश्र्वर  नगर, स्वामी समर्थ नगर आदी  शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती़ भाविकांकडून पालखीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या टाकण्यात आल्या  होत्या़ 
तसेच ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून गर्दी करण्यात आली होती़ भजनी मंडळ विठुरायांच्या गितावर थिरकत होत़े महिलांनी भगवे ध्वज, भगव्या साडय़ा परिधान केलेल्य होत्या़ यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होत़े दरम्यान, तळोदा तालुक्यातील रांझणी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक शुध्द एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादीशीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांझणीसह परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती़पहाटे काकडआरती झाल्यानंतर विठुरायाची महापूजा भास्करभाई कदमबांडे (कुकरमुंडा) यांच्या हस्ते करण्यात आली़ त्यानंतर श्रीहरींची पालखी मिरवणूक काढण्यात आली़ दिवभर रांझणीसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़            दरम्यान, विठ्ठल मंदिरात अखंड  हरिनाम किर्तन सप्ताह सुरु असून त्याअंतर्गत रात्री हभप जिवराज महाराज सूर्यवंशी (कापडणेकर) यांच्या किर्तनाचेही आयोजन करण्यात आले आह़े दरम्यान विठ्ठल मंदिरात काकड, भजन, अभंग आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात पहाटेपासून करण्यात आली  होती़ प्रबोधिनी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम जपासह, होमहवनाचेही कार्यक्रम घेण्यात आले होत़े  या कार्यक्रमांमुळे निद्रेत असलेले भगवंत कार्तिक एकादशीला जागे होऊन विश्वाचे कल्याण करीत असल्याची भाविकांची  श्रध्दा  आह़े 
 

Web Title: Tulshi marriages in Nandurbar, most prominent procession of Vitthuran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.