तळोदा पालिकेच्या सभेत 29 विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:02 PM2018-05-24T13:02:45+5:302018-05-24T13:02:45+5:30

सर्वसाधारण सभा : रस्ते गटारींसह विविध विकासकामांना मंजूरी

Taloda municipal council approved 29 subjects | तळोदा पालिकेच्या सभेत 29 विषय मंजूर

तळोदा पालिकेच्या सभेत 29 विषय मंजूर

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ सभेत शहराच्या विविध विकास योजनांसह 29 विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली़ 
सभेस उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, भास्कर मराठे, अमानुद्दीन शेख, अंबिका शेंडे, हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे, योगेश पाडवी, गौरव वाणी, अनिता परदेशी, संदीप परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, संजय माळी, जालंदर भोई, प्रतिक्षा ठाकूर, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, सविता पाडवी, कल्पना पाडवी उपस्थित होत़े कार्यालय आस्थापनेचे विभाग प्रमुख राजेंद्र सैंदाणे, अनिल माळी, बांधकाम अभियंता शंकरराव गावीत, लेखापाल मनोज परदेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े 
यावेळी शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या वैद्यकीय, मुदतपूर्व सेवा, निवृत्त झालेल्या कर्मचा:यांचे नातेवाईकांना अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, मुख्य कार्यालय व इतर विभागासाठी कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार पुरवण्याबाबत निविदा मागविणे, पालिका हद्दीतील मालमत्तांच्या करपात्र मूल्यांकन सुधारणा, चतुर्थ वार्षिक फेर आकारणी व पालिका हद्दवाढ निश्चित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त सफाई कामगारांचर तपासणी करणे, सुधारित आकृतीबंधानुसार त्यांना पदोन्नती देणे, पालिका हद्दीतील आमदार निधींतर्गत लिंब हद्दीतील हातपंपात पाण्याची मोटार टाकणे, कालिकामाता मंदिराजवळ पाण्याची बोअरींग केली त्याची डिमांड नोट भरणे, शववाहिनीचा नवीन विमा काढणे, घनकचरा डेपो व खुल्या जागेवर कंपोस्टिक खतासाठी शेड व डेपो तयार करणे, बारमाही हिशोबास मंजूरी व प्रसिद्धी, न्यायालयीन कामासाठी कायदेशीर सल्लागार नेमणे, गणेश कॉलनी, सोनराज नगर, धनीशंकर कॉलनी, यमुना नगर, दत्तमंदीर मेनरोड, कल्पना टॉकिज रोड, बडादादा नगर, विक्रम कॉलनी, पिठाई नगर, खटाईमाता नगर, पाडवी हाटी, मोठा माळीवाडा व इतर भागातील सिमेंद्र काँक्रिट रस्ते, गटारींच्या कामांना मंजूरी, आरक्षण क्रमांक सहाच्या जागेवर नगरपालिका कार्यालय बांधकाम यासह बांधकामांना मुदतवाढ आदी 29 विषयांना मंजूरी देण्यात आली़ 
 

Web Title: Taloda municipal council approved 29 subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.