अक्कलकुवा नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 05:59 PM2018-01-18T17:59:29+5:302018-01-18T17:59:43+5:30

Succumbing to student leakage in Akkalkuwa Navodaya Vidyalaya | अक्कलकुवा नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

अक्कलकुवा नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : जवाहर नवोदय विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणा:या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली़ पहाटेच्या दरम्यान झालेला हा प्रकार सकाळी वसतीगृह कर्मचा:यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली़ 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धडगाव येथून आलेल्या मयत विद्यार्थिनीच्या पालक, नातेवाईक यांच्यासह आदिवासी एकता परिषद, भिलीस्थान टायगर संघटना, आदिवासी शिक्षक संघटना यांनी रूग्णालयात ठिय्या आंदोलन करत दोषी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ तोवर शवविच्छेदन होऊ देणार नाही असा, पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आला होता़ दुपारी मयत जागृतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक  व वसतीगृहातील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
जवाहर नवोदय विद्यालयाच्या 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारी जागृती नामदेव पावरा, रा़ रोषमाळ बुद्रुक हीची गुरूवारी प्री-बोर्ड परीक्षा असल्याने ती इतर विद्यार्थिनींसोबत बुधवारी रात्री वसतीगृहात अभ्यास करत होती़ पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती बाहेर गेल्याचे सोबतच्या विद्यार्थिनींना दिसून आल़े बराच वेळ होऊनही ती आली नाही, अभ्यास करत असेल असे वाटल्याने सर्व विद्यार्थिनी झोपून गेल्या़ दरम्यान सकाळी तिचा मृतदेह वसतीगृहाच्या जिन्याखाली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला़ या प्रकाराची माहिती वसतीगृह प्रशासनाने पोलीसांना कळवल्यानंतर तिच्या पालकांना बोलावण्यात आल़े घटनास्थळी आलेल्या पालकांनी एकच टाहो फोडत आक्रोश केला़ रात्री उशिरा जागृती हिचे अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल़े याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास शर्मा रामय्या ओरूंगती यांनी दिलेल्या खबरीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े 
दरम्यान, मयत जागृती हिचे वडील नामदेव पावरा यांच्या फिर्यादीवरून प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास सर्मा ओरूंगती, अधिक्षिका हर्षदा नाईक, हाऊस मिस्ट्रेस मनिषा वळवी, रखवालदार कालुसिंग वळवी, जागृतीचे वर्गशिक्षक आणि इतर स्टाफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यांनी जागृती हीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याची शंका उपस्थित केली आह़े दरम्यान जागृती रात्रीच्यावेळी मैत्रिणींकडून कपडे सुकवण्यासाठी दोरी मागत असल्याचे सांगण्यात आले आह़े

Web Title: Succumbing to student leakage in Akkalkuwa Navodaya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.