नंदूरबारमधील शासकीय आश्रमशाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:05 IST2018-08-27T11:58:06+5:302018-08-27T12:05:32+5:30
नंदूरबारमधील सलसाडी शासकीय आश्रमशाळेत शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नंदूरबारमधील शासकीय आश्रमशाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदूरबार : नंदूरबारमधील सलसाडी शासकीय आश्रमशाळेत शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सचिन चांद्रसिंग मोरे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पालक आणि गावकरी संतप्त झाले आहेत.
संतप्त झालेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये विनय गौडा यांनी गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.