मालपाडा व खुंटागव्हाण येथे जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:04 PM2018-04-03T13:04:14+5:302018-04-03T13:04:14+5:30

महिलांचाही विनयभंग : दोन वेगवेगळे गुन्हे

Stolen robbery at Malpada and Khuntagwan | मालपाडा व खुंटागव्हाण येथे जबरी चोरी

मालपाडा व खुंटागव्हाण येथे जबरी चोरी

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 3 : सुरगसचा मालपाडा व खुंटागव्हाण येथे दोन वेगवेगळ्या घटनेत जमावाने जबरी चोरी करून मारहाण केल्याची घटना घडली.  दोन्ही घटनेत महिलेचा देखील विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी मोलगी पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सुरगसचा मालपाडा, ता.अक्कलकुवा येथील ईश्वर शंकर पाडवी व नरपत नोवसा पाडवी यांच्यात मजुरीच्या पैशांचा वाद होता. या वादातून नरपत नोवसा पाडवी व इतरांनी ईश्वर पाडवी यांच्या घरात जावून घरातील सुटकेस मधील 40 हजार रुपये काढून घेतले. यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या घरातील महिलेला मारहाण करून विनयभंग करण्यात आला. त्यात महिला जबर जखमी झाली. भरत पाडवी व ईश्वर पाडवी यांना देखील मारहाण करण्यात आली. तिघांना मारहाण करून जमावाने तेथून 40 हजार रुपये चोरून नेले.
याबाबत ईश्वर शंकर पाडवी यांनी फिर्याद दिल्याने नरपत नोवसा पाडवी, धर्मा नोवसा पाडवी, आपसिंग नोवसा पाडवी, मिस्त्रीबाई नोवसा पाडवी सर्व रा.सुरगसचा मालपाडा, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना खुंटागव्हाण येथे घडली. खेमा जेगला वळवी व पारता बासरा वळवी यांच्यात शेतीच्या हिस्से वाटणीचा जुना वाद होता. त्याचे पर्यावसान मारहाणीत व जबरी चोरीत झाले. पारता वळवी व इतरांनी खेमा वळवी याच्या घरात घुसून रोख सातशे रुपये काढून घेतले तसेच घरातील महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करून शिविगाळ केली. 
याबाबत खेमा जेगला वळवी यांनी फिर्याद दिल्याने पारता बासरा वळवी, रामा बासरा वळवी, किर्ता बासरा वळवी, आपसिंग पारता वळवी, आगा रमा वळवी, सोन्या दिवाल्या पाडवी सर्व रा.खुंटागव्हाण, ता. अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे व कचरे करीत  आहे. दरम्यान, या प्रकरणी गाव पंच बसवून वाद मिटविण्याचा प्रय} झाला होता.
दोन्ही घटनेतील अद्याप एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.     
 

Web Title: Stolen robbery at Malpada and Khuntagwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.