अक्कलकुव्यात चोरीच्या नऊ दुचाकी जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:47 PM2018-10-14T12:47:55+5:302018-10-14T12:47:59+5:30

नंदुरबार : अक्कलकुवा येथे दुचाकी चोरटय़ांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश ...

Six robbery stolen in Akkalkuwa, two arrested and two arrested | अक्कलकुव्यात चोरीच्या नऊ दुचाकी जप्त, दोघांना अटक

अक्कलकुव्यात चोरीच्या नऊ दुचाकी जप्त, दोघांना अटक

Next

नंदुरबार : अक्कलकुवा येथे दुचाकी चोरटय़ांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.
अक्कलकुवा येथील मोलगी नाक्यावर संशयीत दुचाकी चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे पाळत ठेवली. तेथे चहाच्या टपरीवर दोघा संशयीताना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व डेडीयापाडा येथून नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्या सर्व कमी किंमतीत विकल्याचे सांगितले. त्याआधारे सर्व दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयीतांकडून आणखीही काही दुचाकी चोरल्याची माहिती मिळू शकेल. त्यादृष्टीने पोलीस प्रय} करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक योगेश कमाले, फौजदार भगवान कोळी, जमादार अनिल गोसावी यांच्यासह हवालदार पंढरीनाथ ढवळे, रवींद्र पाडवी, विकास पाटील, प्रदीप राजपूत, दिपक गोरे, जगदीश पवार, विनोद जाधव, सुजाता जाधव, सुभाष तमखाने, ज्योतीबा दिपक, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, विकास अजगे, भटू धनगर, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, तुषार पाटील, महेंद्र सोनवणे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र अहिरराव, राहुल भामरे, जितेंद्र ठाकुर, मोहन ढमढेरे, किरण पावरा, किरण मोरे, अमोल पवार, पंकज महाले, आनंदा मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने         केली.
 

Web Title: Six robbery stolen in Akkalkuwa, two arrested and two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.