जिल्ह्याची दुसरी सहामाही आरोग्यदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:53 AM2019-07-21T11:53:36+5:302019-07-21T11:53:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हानिर्मिती पूर्वी आणि नंतरच्या काळात आरोग्य या एकाच विषयामुळे कायम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ...

The second half of the district is healthy | जिल्ह्याची दुसरी सहामाही आरोग्यदायी

जिल्ह्याची दुसरी सहामाही आरोग्यदायी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हानिर्मिती पूर्वी आणि नंतरच्या काळात आरोग्य या एकाच विषयामुळे कायम राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येणा:या नंदुरबारला यंदाच्या वर्षातील दुस:या सहामाहीत आरोग्यदायी दिवस येणार आहेत़ महिला रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अशी दालने एकाचवेळी कार्यान्वित होणार असल्याने अनेक प्रश्न निकाली निघणार आहेत़     
राज्यशासनाने नंदुरबार येथे 100 खाटांच्या महिला रूग्णालयाला मंजूरी देऊन बांधकामाला परवानगी व निधी दिला होता़ 2014-15 पासून सुरु असलेले रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून वर्षअखेरीस महिला रुग्णालय जिल्ह्याच्या सेवेत येणार आह़े सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 ऑक्टोबर 2011 पासून मंजूर केलेल्या महिला रूग्णालयाच्या बांधकामासाठी 18 कोटी 1 लाख 62 हजार 400 रूपयांच्या निधीला मान्यता दिली गेली होती़ 2011 च्या अर्थसंकल्पात ही तरतूद केली गेली होती़ हे रुग्णालय पूर्ण होत असतानाच धडगाव येथील 50 खाटांचे महिला रुग्णालय अंतिम टप्प्यात आह़े येत्या महिनाभरात येथे कामकाज सुरु होणार आह़े रुग्णालयासाठी भूलतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ यांची नियुक्ती झाल्याने दुर्गम भागातून उपचारासाठी नंदुरबार किंवा इतरत्र जाणा:या मातांना आता धडगावातच उपचार देणे शक्य होऊन त्यांची सुखरुप प्रसूतीही होणार आह़े 
ही दोन रुग्णालये पूर्ण झाली असताना शहादा व मंदाणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकामही वेगाने सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार येथील महिला रुग्णालयासाठी 73 पदांची निर्मिती करण्यात आली आह़े ही पदे लवकरच भरली जाणार असून सार्वजनिक आरोग्य विभाग त्यासाठी कारवाई करत आह़े 

जिल्ह्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानल्या जाणा:या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून डॉ़ गिरीश ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या मंत्रालय स्तरावर नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाचा करार पूर्ण झाला आह़े गेल्या आठवडय़ात त्यावर कारवाई झाली आह़े आता केवळ महाविद्यालयाच्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालय आणि त्याचे विविध कक्ष ताब्यात घेण्याची कारवाई करणे शिल्लक राहिले आह़े ही कारवाई ऑगस्ट मध्यार्पयत पूर्ण होण्याची शक्यता असून याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हा रुग्णालयाला येत्या महिनाअखेर्पयत प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े 

महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक, स्त्रीरोग तज्ञ, प्रसुती तज्ञ, वैद्यकीय अधिकारी , भूलतज्ञ, बधिरीकरण शास्त्रज्ञ, सहायक अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारिका, बालरोग परिचारिका, आहार तज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष-किरण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहायक, भांडारपाल ही पदे मंजूर आहेत़ 
येथे 80 खाटा ह्या महिला रूग्णांसाठी तर नवजात अर्भकांच्या उपचार केंद्रात 20 खाटा दिल्या जातील़ धडगाव येथे 30 खाटा महिलांना 20 खाटा नवजात अर्भकांना दिल्या जातील़ दोन्ही ठिकाणच्या अतिदक्षता विभागात पाच वर्षाखालील बालकांवरही उपचार होणार आह़े अक्कलकुवा येथेही अर्भक केंद्र येत्या दोन महिन्यात सुरु होत आह़े 
 

Web Title: The second half of the district is healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.