टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:51 PM2019-07-17T12:51:39+5:302019-07-17T12:51:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना टवळखोरांपासून सुरक्षितता मिळावी व त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी तळोदा ...

Police campaign for the closure of the tigers | टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोहिम

टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना टवळखोरांपासून सुरक्षितता मिळावी व त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी तळोदा पोलिसांकडून मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरातील व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यात येत असून, या वेळी विद्यार्थिनीं मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तळोदा शहरासह ग्रामीण भागात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. त्यातच तालुक्यातील मोदलपाडा येथे एका अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील स्कार्प ओढण्याची घटना घडली होती. या घटनेत त्या अल्पवयीन मुलीच्या गळ्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर मोदलपाडा येथील माध्यमिक विद्यालयाने रोडरोमिओंचा उपद्रव थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
या घटनांच्या पाश्र्वभूमिवर तळोदा शहरासह ग्रामीण भागातील रोमरोमिओंच्या उपद्रवास पायबंद घातला जावा व विद्याथ्र्याच्या मनातील भीती दूर होऊन त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने शाळा  व महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहे. या दरम्यान विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयात ये-जा करतांना होणा:या त्रासाबाबत करावयाची लेखी तक्रारसह आवश्यक प्रतिबंधात्मक व कायदेशीर बाबीं संबंधी पोलिसांकडून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींनी शाळेत जातांना किंवा येतांना  होणा:या त्रासाबाबत आणि कोणत्याही प्रकारच्या छेडखानीबाबत मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता पोलिसांकडे लेखी तक्रार द्यावी, असे आवाहनदेखील कार्यक्रमाद्वारे पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत मंगळवारी तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी आपल्या सहका:यांसह मोदलपाडा येथील संत गुलाम महाराज माध्यमिक विद्यालयास भेट दिली व तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्याचप्रमाणे बुधवारीदेखील पोलीस प्रशासनाकडून तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालय व न्यू हायस्कूलला भेट देण्यात येणार  असून, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या छेडछाड बाबत असणा:या दंडनीय व कायदेविषयक बाबींसंबंधी             मार्गदर्शन केले जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांनाही छेडछाडीच्या प्रकारांबाबत पत्र देऊन सूचना देण्यात येत आहेत.
पोलिसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या मोहिमेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पालक वर्ग व                शाळा, महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले आहे. यापुढे                अधिक व्यापक व नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम वर्षभर राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत  आहे.

Web Title: Police campaign for the closure of the tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.