नवापूर पालिकेचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:09+5:302021-04-15T04:29:09+5:30

नवापूर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना परराज्यात महागड्या रुग्णालयात पैसे खर्च करून उपचार घ्यावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात नंबर लागत नाही. ...

Oxygen Covid Center of Navapur Municipality started | नवापूर पालिकेचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू

नवापूर पालिकेचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू

Next

नवापूर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना परराज्यात महागड्या रुग्णालयात पैसे खर्च करून उपचार घ्यावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात नंबर लागत नाही. खासगी रुग्णालयात एका रुग्णाला साधारण ५० हजारांवर खर्च होत आहे. अशा बिकट परिस्थितीत नवापूर नगरपालिकेचे कोविड सेंटर हे परिसरातील नागरिकांना लाभदायक ठरणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी असे सुविधांयुक्त कोविड सेंटर सुरू झाले आहे. याठिकाणी महिलांसाठी व पुरुषांसाठी असे दोन भाग करण्यात आले आहेत. संपूर्ण कोविड सेंटरवर सीसीटीव्हीची निगराणी राहणार आहे. भोजनाची व्यवस्था, पुरेसा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. नवापूर नगरपालिकेचे कोविड सेंटर जिल्ह्यात सुविधा देण्याबाबत अव्वल रहावे, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, आरोग्य सभापती बबिता बसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी महेश चौधरी, जालमसिंग गावित, अजय पाटील, सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने नवापूर पालिकेच्या कोविड सेंटरला व्हेंटिलेटर, सहा तज्ज्ञ डॉक्टर्स, साधनसामग्री, औषधसाठा, इंजेक्शन्स वेळेवर पुरविण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी कोरोना आजाराला घाबरून न जाता वेळेवर औषधोपचार केल्यास कोरोना संपूर्णपणे बरा होतो. तोंडाला मास्क, फिजिकल अंतर, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी केले.

Web Title: Oxygen Covid Center of Navapur Municipality started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.