निकालात राज्यातील नंदुरबारचा पहिला नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:30 PM2019-05-23T18:30:57+5:302019-05-23T18:31:19+5:30

नंदुरबार : राज्यात पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदार संघ असलेल्या नंदुरबार मतदारसंघ निकालाच्या बाबतीतही आघाडीवर राहिला असून राज्यातून पहिला निकाल ...

Nandurbar's first number in the state assembly | निकालात राज्यातील नंदुरबारचा पहिला नंबर

निकालात राज्यातील नंदुरबारचा पहिला नंबर

googlenewsNext


नंदुरबार : राज्यात पहिल्या क्रमांकाच्या लोकसभा मतदार संघ असलेल्या नंदुरबार मतदारसंघ निकालाच्या बाबतीतही आघाडीवर राहिला असून राज्यातून पहिला निकाल देण्याचा मान नंदुरबारला मिळाला आहे़ या मतदार संघातून भाजपच्या उमेदवार डॉ़ हिना गावीत या ९५ हजार ६२९ मतांनी विजयी झाल्या आहेत़ त्यांनी काँग्रसचे अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना पराभूत केले़
नंदुरबार मतदार संघात एकूण ११ उमेदवार होते़ त्यापैकी, भाजपच्या डॉ़ हिना गावीत व काँग्रेसचे अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांच्यातच लढत झाली़ उर्वरीत नऊ उमेदवारांची डिपोजीट जप्त झाली आहे़ डॉ़ हिना गावीत यांना एकूण ६ लाख ३९ हजार १३६ मते तर, प्रतिस्पर्धी अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना ५ लाख ४३ हजार ५०७ मते मिळाली़ तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे डॉ़ सुशील अंतुर्लीकर राहिले़ त्यांना मात्र केवळ २५ हजार ७०२ मते मिळाली़ या मतदार संघात नोटावरही अनेकांनी मतदान केले़ एकूण नोटाची संख्या २१ हजार २६ आहे़ भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ़ सुहास नटावदकर हे मात्र फारसा प्रभाव पाडू शकले नाही़ त्यांना केवळ १३ हजार ८२० मते मिळाली़

Web Title: Nandurbar's first number in the state assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.