नंदुरबारात एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:32 PM2018-07-16T13:32:22+5:302018-07-16T13:32:28+5:30

Nandurbaraya Castor Oil Pestoon Marriage Abortion | नंदुरबारात एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात

नंदुरबारात एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात

googlenewsNext

नंदुरबार : पतीसह सासरच्यांनी एरंडीचे तेल पाजून विवाहितेचा गर्भपात करत  15 लाख रूपयांसाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील ईश्वर कॉलनीत हा प्रकार घडल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े 
जागृती राठोड यांचा विवाह अमित हारसिंग राठोड रा़ ईश्वर कॉलनी यांच्यासोबत ऑक्टोबर 2012 मध्ये झाला होता़ यानंतर पती अमित याच्यासह सासू उषा राठोड, दीर शैलेंद्र राठोड, नणंद निशिगंधा राठोड, दीर राजेश हरसिंग राठोड व दीराणी दिप्ती राजेश राठोड या सर्वानी जागृती यांनी माहेरून बंगला बांधण्यासाठी 15 लाख रूपये आणावेत यासाठी छळ सुरू केला होता़ यादरम्यान त्यांच्याकडून वेळोवेळी मारहाण करत विवाहितेस फारकात देण्याची धमकी देण्यात येत होती़ हे सर्व सुरू असतानाच गर्भवती असलेल्या जागृती यांना प्रसूतीच्या पिडा कमी होतील म्हणून काढा घे असे सांगून सासरच्यांनी एरंडीचे तेल पाजत गर्भपात घडवून आणला होता़ 
पिडित विवाहितेचे माहेर हे शहरातीलच असल्याची माहिती आह़े ऑक्टोबर 2012 ते जून 2018 र्पयत सुरू असलेल्या या छळाला कंटाळत महिलेने ही फिर्याद दिली होती़ त्यांच्याकडून शनिवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती अमित राठोड याच्यासह सासू, नणंद, दीर आणि दीराणी आदी सहा जणांविरोधात विविध कलमांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करत आहेत़ 
 

Web Title: Nandurbaraya Castor Oil Pestoon Marriage Abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.