बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी नंदुरबारात मॉल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:05 PM2019-06-16T12:05:15+5:302019-06-16T12:06:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी नंदुरबार येथे मॉल ...

Nandurbar Mall for sale of savings group items | बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी नंदुरबारात मॉल करणार

बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी नंदुरबारात मॉल करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी नंदुरबार येथे मॉल उभारण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ सरकारी जागा उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे राज्य महिला आयोगातर्फे राबविण्यात येणा:या ‘प्रज्वला’ उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रज्वला योजनेच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने, गटविकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते. रावल म्हणाले, राज्यातील बचत गटांच्या उत्पादनांचे चांगले ब्रँडींग आणि पॅकेजींग करून त्यांना बाजारपेठ मिळवून देणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने    प्रज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. आदिवासी भागातील पारंपरिक दागिने, आमचूर, पारंपरिक हस्तकला अशा उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळूवन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या नव्याने तयार होणा:या अॅपच्या माध्यमातून बचत गटाच्या उत्पादनांची माहिती देण्यात येईल.
खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या, महिलांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रज्वला योजनेच्या माध्यमातून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर क्लस्टर तयार करून त्याद्वारे वस्तू उत्पादनाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत या वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
हस्तकलेच्या वस्तुंना चांगली मागणी असून धडगाव येथे महूपासून जॅम आणि सरबत तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसहाय्य मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार गावीत यांनी महिला एकत्र आल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल असे सांगितले. शासनाचा चांगल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. महिलांनी एकत्र येऊन एकच उत्पादन केल्यास त्याला चांगली बाजारपेठ मिळू शकेल. मात्र त्यासाठी गुणवत्तेवरही भर द्यावा, असे ते म्हणाले. 
मोकाशी यांनी प्रज्वला योजनेची माहिती दिली. तर राज्य आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी महिलांसाठी शासनातर्फे राबविण्यात येणा:या विविध योजनांची तर अॅड. उमा चौधरी यांनी कायदेविषयक माहिती दिली. तत्पूर्वी रहाटकर यांनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या स्टॉल्सला भेट दिली.
यावेळी नंदुरबार तालुक्यातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. 

दुसरा टप्पाही नंदुरबारातून
‘प्रज्वला’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षीत करण्यात येणार असून दुस:या टप्प्यात क्लस्टरद्वारे उत्पादन करण्याचे प्रय} करण्यात येणार आहेत. दुस:या टप्प्याचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातूनच करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, प्रज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुस:या टप्प्यात क्लस्टरनिर्मिती व बाजारपेठ उभारणे व तिस:या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रज्वला बचत गट बाजाराची उभारणी करण्यात येणार आहे.राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रात हे अभियान पोहोचविण्यात येणार असून सर्वांनी मिळून बचत गटाची चळवळ पुढे न्यावी हा उद्देश असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.

या अभियानाद्वारे महिलांना एकत्रित आणणे, त्यांचे संघटन, स्वावलंबन, आर्थिक नियोजन आणि विकास अशी प्रणाली तयार होते. या प्रणालीच्या माध्यमातून बचत गटांची महिलांना विकासाची संधी देणारी सक्षम व्यवस्था तयार होणार आहे. महिलांचे सबलीकरण महत्वाचे असून प्रज्वला अभियान हे त्यादिशने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. योजनेच्या माध्यमातून उत्पादनांचे विपणन चांगल्यारितीने होणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर महिलांच्या पारंपरिक कौशल्याला वाव देणे आवश्यक असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे मंत्री रावल यांनी सांगितले.
 

Web Title: Nandurbar Mall for sale of savings group items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.