पेन्शनच्या पैशातून त्यांनी बांधले वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:59 AM2019-06-16T11:59:55+5:302019-06-16T12:00:01+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंदीर, मशीद आणि शाळांच्या बांधकामासाठी अनेक दाते पुढे येत असतांना ख:या ...

The library built by pension money | पेन्शनच्या पैशातून त्यांनी बांधले वाचनालय

पेन्शनच्या पैशातून त्यांनी बांधले वाचनालय

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंदीर, मशीद आणि शाळांच्या बांधकामासाठी अनेक दाते पुढे येत असतांना ख:या अर्थाने विचार आणि संस्काराचे केंद्र असलेल्या ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यासाठी देखील दाता मिळणे दुरापस्त झाले आहे. अशा स्थितीत पेन्शनच्या निधीतून ग्रंथालयाची इमारत बांधण्याचा भालेर, ता.नंदुरबार येथील निवृत्त पोस्टमास्तर बाळू काशिनाथ कुवर यांचा उपक्रम सर्वत्र कौतूकाचा ठरला आहे.
भालेर येथे श्री गुरुदत्त सार्वजनिक वाचनालय गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे. याच वाचनालयाचे संस्थापक बाळू काशिनाथ कुवर हे पोस्ट आणि दुरसंचार खात्यात नोकरीला होते. पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले असून निवृत्तीनंतर त्यांनी आपले आयुष्य समाज कार्याला वाहिले आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी गावोगावी फिरून बेलची रोपं वाटपाचा उपक्रमातून ते चर्चेत आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी वाचनालयाची इमारत बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी आर.आर.फाऊंडेशनकडे निधीची मागणीही केली. फाऊंडेशनने निधीला मंजुरी दिली असली तरी ती अपुर्ण पडल्याने इमारत बांधावी कशी असा प्रश्न पडला होता. त्यामुळे कुवर यांनी आपल्या पेन्शनचा आलेला सर्व पैसा वाचनालयाच्या इमारतीसाठी दान केला आणि इमारत पुर्ण केली. सुमारे 1300 चौरसफूट जागेत ही इमारत आहे. या इमारतीसाठी एकुण 13 लाख रुपये खर्च आला आहे. त्यासाठी आर.आर.फाऊंडेशनने केवळ सहा लाखाचा निधी दिला आहे. उर्वरित सात लाख रुपयांचा खर्च कुवर यांनी केला आहे. हे वाचनालय जिल्ह्यातील स्वत:ची इमारत असलेले ग्रामिण भागातील पहिले वाचनालय ठरले आहे. या वाचनालयात एकुण पाच हजार पुस्तके असून स्वतंत्र इमारत झाल्यानंतर या ठिकाणी बाल विभाग, महिला विभाग स्वतंत्र करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामिण भागातील विद्याथ्र्याना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व अभ्यासाचे केंद्र येथे स्थापन करण्यात येणार आहे. अतिशय टुमदार व देखणी इमारत या वाचनालयाची उभी झाली असून ते  ग्रंथालय क्षेत्रातील एक आकर्षण ठरले आहे.

ग्रंथालय हे ख:या अर्थाने ज्ञानमंदीर असते त्यामुळे श्री गुरुदत्त वाचनालयाच्या उभारणीसाठी आपले सुरुवातीपासून प्रय} होते. वाचनालयाचा ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत होता. त्यामुळे वाचनालयाची स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी आपले प्रय} होते. अनेक प्रय}ानंतर जागेची उपलब्धता झाली, निधीसाठी प्रशासनाचे सहकार्य लाभले, पण पुरेसा निधी न मिळाल्याने अखेर पेन्शनचा पैसा या चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश मिळाले. इमारत पाहुण खूप आनंद होत असल्याचे बाळू कुवर यांनी सांगितले. 
 

Web Title: The library built by pension money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.