नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:13 PM2018-02-23T13:13:03+5:302018-02-23T13:21:52+5:30

Insurance cover for two fruitpic in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण

नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याला गारपीट किंवा वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सर्वत्र उपाय योजण्यात येत असले तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशा विमा संरक्षणाबाबत मात्र उदासिनता आह़े जिल्ह्यातील दोनच फळपिकांना विम्याचे सरंक्षण असल्याने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास, पुढे काय, असा प्रश्न शेतक:यांना सतावत आह़े  
शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येत़े यात द्राक्ष, संत्रा, डाळींब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू या फळपीकांचा समावेश आह़े नैसर्गिक आपत्तीत नुकसानीनंतर सर्वात मोठा आधार असलेल्या विमा सरंक्षणासाठी मात्र नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि आंबा ही दोनच फळपिके पात्र आहेत़  दोघांचे हेक्टरी क्षेत्र हे मंडळनिहाय 20 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असल्याने त्यांना विमा सरंक्षण मिळू शकले आह़े  इतर फळबागांचे मंडळनिहाय क्षेत्र हे कमी असल्याने त्यांचा समावेश विमा संरक्षणात झालेला नाही़ परिणामी नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार कशी याबाबत कोणतीही तरतूद शासनाकडे नाही़ यामुळे जिल्ह्यात फळपिकांच्या लागवडीबाबत उदासिनता वाढून त्यांची लागवड घटण्याची भिती आह़े 
विशेष म्हणजे राज्यात दुस:या क्रमांकाचे पपई उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात येत़े मात्र राज्यासह जिल्ह्यातील पपई उत्पादन फलोत्पादन विमा संरक्षण कक्षेत नसल्याने शेतक:यांची घोर निराशा झाली आह़े हीच गत टरबूज उत्पादनाची आह़े ही दोन्ही उत्पादने प्रत्येक मंडळात किमान 30 हेक्टर्पयत घेतली जात आहेत़ 
जिल्ह्यात यंदा साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर केळीबागा आहेत़ या पिकाना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी 11 हजार रूपये प्रतिहेक्टर विमा संरक्षण देण्यात आले आह़े निसर्ग कोपल्यानंतर जमिनदोस्त होणा:या केळी बागायतदारांना तात्काळ भरपाई देण्याचे नियोजन याद्वारे आह़े शेतकरी पिक कर्ज घेत असतानाच त्यांच्याकडून विम्याची रक्कम वसुल करण्याचा पायंडा शासनाने घालून दिला आह़े यामुळे मोठे क्षेत्र असलेल्या शेतक:यांनी तात्काळ विमा करून घेत असल्याचे निदर्शनास आह़े 
जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर आंबा बागा आहेत़ यातील 600 हेक्टर आंबा बागा ह्या नवापूर तर उर्वरित 1400 हेक्टर आंबा बागा ह्या तळोदा धडगाव आणि अक्कलकुवा यात तीन तालुक्यात आहेत़ तळोदा आणि नवापूर तालुका वगळता इतर तीन तालुक्यात विमा सरंक्षणच झालेले नसल्याची माहिती आह़े विशेष म्हणजे गतवर्षी 145 बागायतदार शेतक:यांनी विमा योजनेत सहभाग दिला होता़ यंदाही सरासरीने 150 बागायतदारांनी विमा संरक्षण घेतले आह़े हेक्टरी सहा हजार रूपये रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यातून कपात झाली आह़े

Web Title: Insurance cover for two fruitpic in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.