पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसाकडून खेडदिगरच्या आगग्रस्त कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 08:56 PM2019-04-15T20:56:05+5:302019-04-15T20:56:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे गुढीपाडवाच्या दिवशी  घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली होती. ...

Help for the fire brigade family of Khedidigar from Panchnamy police | पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसाकडून खेडदिगरच्या आगग्रस्त कुटुंबाला मदत

पंचनाम्यासाठी आलेल्या पोलिसाकडून खेडदिगरच्या आगग्रस्त कुटुंबाला मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे गुढीपाडवाच्या दिवशी  घराला आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली होती. आगीची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस झालेले नुकसान पाहून भाऊक झाले व त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन सहकार्य केले.
याबाबत वृत्त असे की, खेडदिगर येथील रिक्षा चालक धनराज नवसारे  हे आई, प}ी, दोन बहिणी यांच्यासह वास्तव्यास आहेत. गुढीपाडवाच्या दिवशी 11 वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यात मजुरी करून गोळा केलेले धान्य, कापूस, सोने-चांदीचे दागिने, कपडे, कपाट आदींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघडय़ावर आल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेचा  पंचनामा करण्यासाठी आलेले म्हसावद पोलीस ठाण्याचे  पो.कॉ.दादाभाई वाघ हे झालेले नुकसान पाहून गहिवरले. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करून माणुसकी दाखवली. ग्रामस्थांकडूनही नवसारे कुटुंबाला मदत करण्यात येत असून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Help for the fire brigade family of Khedidigar from Panchnamy police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.