परदेशी पक्ष्यांचा शहाद्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:13 PM2019-06-16T12:13:06+5:302019-06-16T12:13:11+5:30

ईश्वर पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समुद्रापलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा स्थलांतरित ...

Foreign birds stay in Shahada | परदेशी पक्ष्यांचा शहाद्यात मुक्काम

परदेशी पक्ष्यांचा शहाद्यात मुक्काम

Next

ईश्वर पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : समुद्रापलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा स्थलांतरित पक्षी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मुक्कामाला आलेले आहेत. स्थलांतरीत पक्षी हे या भागात पिल्लांना जन्मास घालून पिल्लांसोबत आलेल्या ठिकाणी परत जातात.
शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे हे गेल्या नऊ वषार्पासून पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धन करण्याचे काम करीत आहेत. सपकाळे हे शहादा येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात असलेल्या जागेत पक्षीमित्रांसाठी घरटे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, त्यांना लागणारे अन्नधान्य याची सोय केली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून दक्षिण आफ्रिकेतील समुद्रकिना:यालगत माय ग्रेटर कॅटल ग्रेड हा पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात भारतात येतो. सुमारे 30 ते 32 हजार किलोमीटर अंतर कापून हा पिलांना जन्म घालण्याकरिता भारतात येतो. 40 ते 50 नर आणि मादी पिल्लांच्या जोडपींनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या लिंबांच्या दोन झाडांवर गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान मांडले आहे. हे पक्षी माणसांची  कमी वर्दळ परंतु सुरक्षितता असलेल्या मनुष्यवस्तीजवळ काही दिवस  मुक्कामाला थांबतात. बगळा वर्णीय असलेले कॅटल ए ग्रेड हे पक्षी समुद्रालगत मुक्कामाला राहत असल्याने  भरती-ओहोटी, चक्रीवादळ  यापासून सुरक्षित  राहावे म्हणून स्थलांतर  करतात. हे पक्षी सुरक्षित जागेवर थांबल्यानंतर नर-मादींचे मिलन होऊन अंडी दिल्यानंतर पिल्लांना जन्म घालतात. सुमारे चार पिल्ले एकावेळेस जन्माला घालतात. जन्माला घातलेल्या पिल्लांपैकी सक्षम असलेल्या पिल्लांना पावसाळ्याच्या 15 दिवस अगोदर पक्षी परत समुद्रकाठी आपल्या स्थळी परततात. 
पक्षीमित्र व उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षापासून पक्ष्यांबद्दल माहिती घेत पक्ष्यांनी आपल्या परिसरात रहावे, हिंडावे हा त्यामागील मुख्य उद्देश  आहे. माणसांच्या सुरक्षेसोबतच पक्षी, प्राणी, कीटकनाशके यांची सुरक्षितता करण्यासाठी पक्षीमित्र संघटना स्थापन केली आहे. गेल्या नऊ वर्षात विविध पोलीस मुख्यालय कार्यालयाच्या आवारात पक्ष्यांसाठी घरटी, पिण्याची पाण्याची व्यवस्था अशा सुविधा केलेल्या आहेत. निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतू  हे सर्व जगणे आवश्यक आहे. पक्ष्यांना अन्न म्हणून किराणा दुकानात दिवसभरात जमिनीवर पडलेले कडधान्य गोळा करून ते देण्यात येते. तसेच कृत्रिम पाणवठाही तयार करण्यात आला आहे.
 

Web Title: Foreign birds stay in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.