नवापूरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:55 PM2018-05-22T12:55:54+5:302018-05-22T12:55:54+5:30

Fierce rivalry in two groups | नवापूरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

नवापूरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : नवापूर शहरातील जुना सरकारी दवाखान्याजवळ दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले आहेत़ 
रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जहीर युसूफ आणि वसीम शेख सलीम व सुलतान युसूफ खान यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता़ यातून  जहीर युसूफ, रईस रशिद, सिद्दीक रशिद, युसूफ खडय़ा, मयूर शैलेंद्र सावरे, सनी शैलेंद्र सावरे, अजय राजेंद्र जाधव, अविनाश दिनेश जाधव, रोशन आरिफ सय्यद, सादीक इलियास, मिनाबाई, अनु युसूफ  आणि वसीम शेख, युसूफ खान, अजगर, नाजमिन सुलतान खान, आसू, शोएब, अल्ताफ, ईरफान, मोहिसीन (पूर्ण नावे माहित नाहीत) यांच्यात तुंबळ हाणामारी झाली़ यात दोन्ही गटांकडून लाठय़ा काठय़ा, लोखंडी सळ्या यांचा वापर करण्यात आला़ उशिरार्पयत सुरू असलेल्या हाणामारीदरम्यान महिलांसह आठ जण जखमी झाल़े घटनेनंतर नाजमिन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहीर युसूफ याच्यासह 11 जणांवर तर जहिर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम शेख याच्यासह 7 जणांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनास्थळी पोलीसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली होती़ 
 

Web Title: Fierce rivalry in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.