आरोग्य विभागाच्या अॅम्ब्युलन्स झाल्या प्रवासी वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 04:19 PM2018-12-31T16:19:29+5:302018-12-31T16:19:34+5:30

नंदुरबार : आपत्कालीन स्थितीत मोलाची भूमिका बजावून नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने दोन रुग्ण वाहून नेणा:या रुग्णवाहिकांची खरेदी केली होती़ ...

Expatriate vehicles are used by the Health Department's ambulance | आरोग्य विभागाच्या अॅम्ब्युलन्स झाल्या प्रवासी वाहने

आरोग्य विभागाच्या अॅम्ब्युलन्स झाल्या प्रवासी वाहने

Next

नंदुरबार : आपत्कालीन स्थितीत मोलाची भूमिका बजावून नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाने दोन रुग्ण वाहून नेणा:या रुग्णवाहिकांची खरेदी केली होती़ ह्या अॅम्ब्युलन्स सध्या भंगारात निघाल्या असून खाजगी प्रवासी वाहनाप्रमाणे रुग्णवाहिकांचा आजवर उपयोग झाला आह़े  
16 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात 13 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा आणि 1 सामान्य रुग्णालय आहेत याठिकाणी वर्षभरात किमान साडेपाच लाख रुग्ण उपचार घेतात़ यात 1 लाख 84 हजार रुग्ण हे थेट दाखल होऊन उपचार करुन घेतात़   गंभीर स्थितीतील रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयार्पयत घेऊन येणा:या रुग्णवाहिकांचा प्रश्न जिल्ह्यात यापूर्वीही चर्चिला गेला आह़े यातून खाजगी कंपनीच्या  108 खाजगी रुग्णवाहिकांव्यतिरिक्त सुधारणा झालेल्या नाहीत़ यात आपत्कालीन स्थितीसाठी लागणा:या दोन रुग्ण वाहून नेणा:या रुग्णवाहिका काही वर्षापूर्वी खरेदी करण्यात आल्या होत्या़ ‘आठ सीटर’ प्रवासी वाहन असलेल्या या रुग्णवाहिका ‘दोन रुग्ण’ वाहून नेणा:या रुग्णवाहिका म्हणून आरोग्य विभाग चालवत आह़े यातील 10 पैकी 3 रुग्णवाहिका आजघडीस रस्त्यावर धावत असून सात रुग्णवाहिका ह्या पडून असल्याची माहिती आह़े  
दुरुस्तीअभावी पडून असल्याचे सांगण्यात येत असले तरी या वाहनांना त्या-त्या रुग्णालय व आरोग्य विभागाकडून डिङोलसाठी पैसे देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याने ते निरुपयोगी ठरत आहेत़ शासनाने खरेदी केलेली साधने भंगारात निघत असतानाही संबधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े कोपर्ली व शनिमांडळ ता़ नंदुरबार, कलसाडी, मंदाणा व आडगाव ता़ शहादा, वावडी व प्रतापपूर ता़नवापूर, तोरणमाळ व तेलखेडी ता़ धडगाव आणि मोलगी ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन रुग्ण वाहून नेणा:या रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या़ यातील शनिमांडळ येथील आठ सीटर प्रवासी वाहनाला रुग्णवाहिकेचा दर्जा देऊन तीन दोन रुग्ण वाहून नेणारी असल्याचे सांगण्यात आले आह़े कलसाडी आणि आडगाव येथील वाहन नादुरुस्त आह़े उर्वरित ठिकाणीही हीच स्थिती असून देखभाल दुरुस्तीअभावी या वाहनांची धूळधाण झाली आह़े 
्आठ ते नऊ प्रवासी वाहून नेणा:या या वाहनांची 1 लिटर डिङोलमागे प्रत्येकी सात ते 10 किलोमीटर धावण्याची क्षमता आह़े यातून वारंवार डिङोल आणण्यासाठी दुस:या वाहनाचा वापर करावा लागत असल्याने या वाहनांना अडगळीत टाकण्यात आल्याची माहितीही समोर आली आह़े प्रवासी वाहून नेणा:या वाहनापेक्षाही त्यांची दयनीय स्थिती झाली आह़े 

Web Title: Expatriate vehicles are used by the Health Department's ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.