नंदुरबारातील भोंगऱ्या बाजारावर ‘इलेक्शन फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:33 AM2019-03-19T11:33:25+5:302019-03-19T11:33:38+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी भागात सध्या होळीपूर्व भरणाऱ्या भोंगºया बाजाराची धूम सुरू असून या बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत ...

Election Fever on the market of Nandurbar | नंदुरबारातील भोंगऱ्या बाजारावर ‘इलेक्शन फिव्हर’

नंदुरबारातील भोंगऱ्या बाजारावर ‘इलेक्शन फिव्हर’

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी भागात सध्या होळीपूर्व भरणाऱ्या भोंगºया बाजाराची धूम सुरू असून या बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारही सहभागी होत असल्याने या बाजारावर सध्या ‘इलेक्शन फिव्हर’ दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात होळीची वेगळी प्रथा आहे. या होळीनिमित्ताने त्याच्या बाजारासाठी होळीपूर्व भोंगºया बाजार भरण्याची प्रथा आहे. अनेक गावांमध्ये हा बाजार भरतो. या बाजारात परिसरातील गावातील लोक सहभागी होऊन होळीची खरेदी करतात. त्याला वेगळ्या संस्कृतीची जोडही आहे. गेल्या आठवडाभरात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, धडगाव, फलाई आदी विविध ठिकाणी हे बाजार भरले. या बाजारात इच्छुक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी सहभागी होताना दिसत आहेत. या गर्दीतच उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांकडून लोकसंपर्क करण्यात येत असून अप्रत्यक्ष निवडणूक प्रचारही होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Election Fever on the market of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.