दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली ‘सौदी’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:23 PM2019-04-21T12:23:22+5:302019-04-21T12:23:44+5:30

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा ...

In the drought-season, the banana banal came out of 'Saudi' | दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली ‘सौदी’ला

दुष्काळी झळातही सातपुड्याची केळी निघाली ‘सौदी’ला

Next

नंदुरबार : यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे चेहरे कोमेजायला आले असतानाच रक्ताचे पाणी करुन केळीची जोपासना करणाºया सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची केळी सौदी अरेबियात निर्यात झाली आहे़ आतापर्यंत जवळपास ११० कंटेनर रवाना झाले असून महिनाभरात १५० पेक्षा अधिक कंटेनर केळी सातासमुद्रापार जाणार आहे़
जिल्ह्यात ऊसाबरोबरच पपई, मिरची आणि केळी हे बागायती पिके घेतली जातात़ शेतकºयांनी आधुनिकतेची कास घेत शेती हायटेक केली आहे़ त्याचे चांगले परिणाम गेल्या काही वर्षापासून दिसत आहेत़ विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांनी धाडस करुन निर्यातीसाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी काही कंपन्यांशी समन्वय साधून तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी गट तयार केला़ या गटात मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी सहभाग घेतला आहे़ सुमारे १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी जवळपास १२ लाख केळीच्या रोपांची लागवड केली होती़ त्याचे उत्पादन सुरु झाले असून ही केळी आता, निर्यात होऊ लागली आहे़ ब्राह्मणपुरी, पाडळदा, म्हसावद यासह इतर गावातील शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे पिके वाचवणे शेतकºयांसाठी अवघड होत असून अशा बिकट परिस्थितीतही केळी उत्पादक शेतकरी केळीची जोपासना करण्यात दिवसरात्र एक करीत आहेत़ त्याचे फलीत त्यांना दिसू लागले असून या केळींच्या बागांपुढे आता निर्यातीसाठी कंटेनर लागू लागले आहेत़ विशिष्ट पद्धतीने केळीच्या घडाची कापणी करुन त्यावर प्रक्रिया करीत केळीची पॅकिंग केली जात आहे़ यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे़

Web Title: In the drought-season, the banana banal came out of 'Saudi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.