कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:45 PM2019-07-20T12:45:31+5:302019-07-20T12:45:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई ठेकेदाराने मासिक पगारात वाढ करावी या मागणीसाठी शुक्रवारी सफाई कामगार कर्मचा:यांनी सकाळी नगरपालिकेच्या ...

Contract Worker's Stamp | कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या

कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सफाई ठेकेदाराने मासिक पगारात वाढ करावी या मागणीसाठी शुक्रवारी सफाई कामगार कर्मचा:यांनी सकाळी नगरपालिकेच्या चौकात ठिय्या आंदोलन केले. जोपयर्ंत सकारात्मक तोडगा निघत नाही तोपयर्ंत काम न करण्याच्या निर्णय कर्मचा:यांनी घेतला होता.
नगरपरिषदच्या आरोग्य विभागामार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे येथील सेवा फाऊंडेशन या संस्थेला ठेका देण्यात आला आहे. कामाचा मोबदला मिळावा व मासिक पगारात वाढ करावी यासाठी सफाई कर्मचा:यांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी संस्थेच्या कार्यालयाच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यासाठी गेले होते. परंतु, संबंधितांनी निवेदन  स्विकारण्यास  मनाई करत मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप कामगारांनी केला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील युवक पालिकेच्या कंत्राटी तत्वावरील ठेकेदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. 
शहरातील सर्व प्रभागांमधील  इमारत, गल्लीबोळातील घरे व हॉटेल मधील कचरा संकलन करून कचरा गाडी द्वारे डेपो पयर्ंत पोहचवून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम कामगारांकडून करण्यात येते. परंतु अल्प पगारावर राबविले जात असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर कामगारांच्या सह्या आहेत.
 

Web Title: Contract Worker's Stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.