मद्यपी मुलाचा पित्याकडून खून : वाघर्डेची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:31 PM2018-03-17T12:31:23+5:302018-03-17T12:31:23+5:30

मृतदेहाचा परस्पर दफनविधी : आठवडाभरानंतर उघड

The blood of the alcoholic boy: the incident of the wagerty | मद्यपी मुलाचा पित्याकडून खून : वाघर्डेची घटना

मद्यपी मुलाचा पित्याकडून खून : वाघर्डेची घटना

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : शहादा तालुक्यातील वाघार्डे येथील एकाने आपल्याच मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवेठार मारून त्याचे प्रेत घरामागील शौचालयाच्या खडय़ात पुरून ठेवल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेचे वृत्त   कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीस तत्काळ  ताब्यात घेतले. मयत हा धान्य विकून दारूपित असल्याच्या रागातून ही घटना घडल्याचा प्राथमिक             अंदाज व्यक्त करण्यात येत  आहे.
पोलीस सूत्रानुसार असे की, मंदाणेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघर्डे गावात द्वारका पौलद चव्हाण हा प}ी व मुलांसह रहात होता. त्याच्या तीन मुलांपैकी एक मुलगा मगन हा कुटुंबासह दुधखेडा येथे वास्तव्याला आहे तर तिसरा लहान मुलगा हा प}ीसह  होळी निमित्ताने चांदसैली येथे गेलेला होता व मयत छगन याची प}ीही नवानगर येथे माहेरी होळी सणासाठी गेली होती. त्यामुळे घरात द्वारका, प}ी विमलबाई, मुलगा छगन व त्याचा मुलगा जयेश असे चार जण सध्या रहात होते. 9 मार्च रोजी  रात्रीच्या सुमारास सर्व जण जेवायला बसले असताना छगन हा दारू पिवून आलेला होता. त्यामुळे द्वारका चव्हाण यांना छगन हा दारू प्यालेला दिसल्याने त्यास वडिलांनी तू धान्य विकून दारू पितोस असे करू नको  असे सांगितले. छगनला याचा राग आला. या कारणावरून पिता-पूत्रामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जावून दोघांमध्ये झटापटी झाल्या. त्यातच छगनने विळा घेवून वडिलांना मारायला धावला. तेवढय़ात आईने छगनच्या हातातील विळा हिसकावण्याचा प्रय} केला. परंतु तेवढय़ात त्याने तो विळा वडिलांवर मारून फेकला. मात्र तो विळा वडिलांनी चुकवला अशातच वडील द्वारका यानेही लाकडी दांडक्याने छगनच्या पोटावर, छातीवर दांडक्याने जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेला छगन जागेवरच कोसळला. पिता-पूत्रांमध्ये नेहमी वादावादी, मारामारी होत असल्याने विमलबाई ह्या घरा बाहेर झोपून गेल्या.
छगनचा जागीच मृत्यू
वडील द्वारका याने लाकडी दांडक्याने छगनच्या पोटावर, छातीवर व डोक्यावर केलेल्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून द्वारका चव्हाण याने त्याची कोणालाही कुणकुण लागू न देता विल्हेवाट लावण्याचा प्रय} केला. सकाळी प}ीने छगनच्या बाबतीत विचारपूस केल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. प}ीनेही याबाबत गांभीर्य न घेता त्या  कामाला निघून गेल्या. घरी कुणीही नाही याची संधी साधून द्वार याने घरामागील शौचालयाच्या सोश खडय़ात छगनचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रय} केला. संध्याकाळी प}ी घरी परतल्यावर शौचालयाचे बांधकाम केल्याचे आढळून आले.
याबाबत प}ी विमलबाईने विचारणा केली असता पाईप टाकल्याचे द्वारका चव्हाणने सांगून टाळाटाळ केली व छगनही कुठे कामाला गेला असावा असे विमलबाईंना वाटले. अखेर घटना उघडह्या घटनेस तब्बल आठवडा उलटला तरी ह्या घटनेचा उलगडा झाला नाही. अखेर मृतदेहाची दरुगधी यायला लागल्यानंतर मयत    छगनच्या काकांना याची कुणकुण लागली. त्यांनी लगेच विमलबाईंना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमलबाईंनी पोलीस पाटील यांना माहिती देवून शहादा पोलिसांना कळविले.
परिसरात खळबळ
परिसरात भुलाणे येथे लहान भावाने शुल्लक कारणावरून मोठय़ा सख्या भावाला भर दिवसा ठार केल्याची घटना अगदी ताजी असताना  वाघर्डे येथील बापाने मुलाला ठार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला          यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.
 

Web Title: The blood of the alcoholic boy: the incident of the wagerty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.