तरुणाईला दिशा देणारी आनंदकुमारची ‘फ्रेंडशिप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:54 AM2019-07-21T11:54:40+5:302019-07-21T11:55:07+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा ...

Anandkumar's 'Friendship', giving direction to the youth! | तरुणाईला दिशा देणारी आनंदकुमारची ‘फ्रेंडशिप’!

तरुणाईला दिशा देणारी आनंदकुमारची ‘फ्रेंडशिप’!

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : व्हॉटअप, फेसबुकमुळे आजची तरुणाई भरकटली असून ती वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचा मानणा:या वर्गाला ‘आनंदकुमार’ने आपल्या कृतीतून चांगलेच उत्तर दिले आह़े अवघ्या 16 वर्षाच्या या अवलियाने ‘फ्रेंडशिप’ ही इंग्रजी कादंबरी लिहून सर्वानाच चकीत केले असून त्याच्या या साहित्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े  
आनंदकुमार बुद्धर पाटील हा नंदुरबार तालुक्यातील करजकुपा येथील शेतकरी कुटूंबातील तरुण़ तो नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आह़े या तरुणाने फ्रेंडशिप ही कादंबरी लिहिली असून ती चेन्नई येथील नोशन प्रेस प्रकाशित करीत आह़े 184 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी असून त्यात आनंदकुमारने मैत्रीचे अनोखे नाते मांडले आह़े एखाद्या प्रगल्भ साहित्यिकाच्या तोडीचे हे साहित्य असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े 
यासंदर्भात आनंदकुमारशी संवाद साधला असता, तो म्हणतो की, माङो प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आह़े पाचवीर्पयतचे शिक्षण नंदुरबार येथेचे घेतल़े शिक्षण घेत असतानाच इंग्रजी साहित्य वाचण्याची ओढ लागली़ पाचवीत असतानाच सर्वप्रथम चेतन भगत यांचे ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ हे पुस्तक वाचले आणि इंग्रजी साहित्याबाबत अधिकच प्रभावित झालो़ त्यानंतर सातत्याने विविध इंग्रजी साहित्यिकांची पुस्तके, कादंब:या वाचल्या आणि त्यातूनच एक मैत्रीचे कथानक डोळ्यासमोर आल़े ते शब्दबद्ध केले असून अनेक साहित्यिकांना ते दाखविले त्यांनी कौतूक केल़े चेन्नई येथील नोशन प्रेसने प्रकाशित करण्यासंदर्भात प्रेरित करुन त्याबाबत करारही केला़ त्यामुळे ही कादंबरी साकारत आह़े त्याचे पूर्ण श्रेय वडील बुद्धर गोपाळ पाटील व आई साधनाबेन पाटील यांना असल्याचे तो सांगतो़  

लेखक व्हायचेय़़! आजचे तरुण आपल्या करीयरसाठी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, खेळाडू, उद्योजक असे विविध क्षेत्र निवडतात़ पण आनंदकुमार मात्र आपल्याला साहित्यिक व्हायचे आहे, असे सांगतो़ त्यासाठी त्याने दहावीनंतर अकरावीत विचारपूर्वक कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून साहित्य क्षेत्रातच करियर करण्याचा निर्धार केला आह़े पहिल्या कादंबरीने उत्साह आला असून आता वाचकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा असल्याचे त्याचे म्हणणे आह़े 
 

Web Title: Anandkumar's 'Friendship', giving direction to the youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.