ट्रकने कट मारल्यामुळे आमदाराच्या गाडीला अपघात, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 21:08 IST2018-09-17T19:01:33+5:302018-09-17T21:08:46+5:30

धुळे-नंदुरबार राज्य महामार्गावरील वावद गावाजवळ शिरीष चौधरी यांची गाडी रस्ता सोडून पुढे गेली

Accused killed in truck accident, three injured in accident | ट्रकने कट मारल्यामुळे आमदाराच्या गाडीला अपघात, तिघे जखमी

ट्रकने कट मारल्यामुळे आमदाराच्या गाडीला अपघात, तिघे जखमी

नंदूरबार - अळमनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. धुळे-नंदुरबार राज्य महामार्गावरील वावद गावाजवळ शिरीष चौधरी यांची गाडी रस्ता सोडून पुढे गेली. या अपघातात शिरीष चौधरी जमखी झाले आहेत. एका भरधाव ट्रकने चौधरी यांच्या पजेरो गाडीला कट मारल्याने त्यांची गाडी रस्ताच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची माहिती आहे. 

आमदार शिरीष चौधरी यांच्यासह या अपघातात आणखी तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांकडून पंचनामा आणि तपास करण्यात येत आहे. दरम्यान, शिरीष चौधरी हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडूण आले आहेत.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Accused killed in truck accident, three injured in accident