किसान सन्मानसाठी जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:53 PM2019-02-20T12:53:20+5:302019-02-20T12:53:50+5:30

सुटी रद्द : 33 हजार शेतक:यांची नावे नोंदवली

78 thousand farmers of the district: Survey of the farmers for the honor | किसान सन्मानसाठी जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण

किसान सन्मानसाठी जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण

Next

नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 78 हजार शेतक:यांचे सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले आह़े झालेल्या सव्रेक्षणातील 33 हजार शेतक:यांची नावे महसूल विभागाने केंद्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली असून यासाठी मंगळवारीही कामकाज सुरु होत़े  
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शासकीय सुटी जाहिर करण्यात आली होती़ परंतू केंद्र शासनाने घोषित केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे कामकाज येत्या 22 फेब्रुवारीर्पयत पूर्ण करण्याचे आदेश आहेत़ यानुसार मंगळवारी सर्व सहा तहसील कार्यालये, तलाठी कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होत़े यानुसार मंगळवारी तहसीलदारांसह, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी यांना कामावर हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले होत़े दिवसभर या कामाची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़एम़कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, प्रांताधिकारी वान्मती सी़ व लक्ष्मीकांत साताळकर यांनी धडगाव, तळोदा, नवापूर, शहादा, नंदुरबार आणि अक्कलकुवा तहसील कार्यालयात भेटी देत माहिती घेतली़
तलाठींकडून पूर्ण करण्यात आलेल्या सव्रेक्षित याद्यांमधील नावे सन्मान योजनेच्या वेबसाईटवर दिवसभरात अपलोड करण्यात येत होत्या़ यात प्रामुख्याने शेतक:याचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच सातबारावरील माहिती दिली गेली आह़े 22 फेब्रुवारीर्पयत जिल्ह्यात सर्वच शेतक:यांचे सव्रेक्षण ग्रामस्तरीय समिती पूर्ण करणार आह़े सोबतच शेतक:यांची नावे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत़ या दुहेरी कामकाजामुळे मार्च अखेरीस शेतक:यांच्या खात्यावर तीन हजार ते सहा हजार रुपयांची वार्षिक मदत जमा होणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: 78 thousand farmers of the district: Survey of the farmers for the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.