तहान लागल्यावरच विहिरीची खोदाई का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:17 AM2018-10-08T00:17:01+5:302018-10-08T00:17:26+5:30

ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान पाहता देगलूर, मुखेडसह इतर तालुक्यात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. त्यापूर्वीच पाणी पुरवठ्याची कामे मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

What is the digging of a well after thirst? | तहान लागल्यावरच विहिरीची खोदाई का?

तहान लागल्यावरच विहिरीची खोदाई का?

Next
ठळक मुद्देग्रामीण पाणी पुरवठा : कोट्यवधीचा निधी उपलब्ध, योजनांना अपेक्षित गती मिळेना

विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांसह देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहे. त्या तुलनेत कामांना गती मिळत नसल्याने तहान लागल्यानंतरच विहिर खोदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाचे पर्जन्यमान पाहता देगलूर, मुखेडसह इतर तालुक्यात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. त्यापूर्वीच पाणी पुरवठ्याची कामे मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर अखेर ८१ टक्के पाऊस नोंदविला असला तरी देगलूरसह मुखेड, नायगाव, धर्माबाद आदी तालुक्यात पर्जन्यमान कमी झालेले आहे. देगलूर तालुक्यात तर अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. अशी स्थिती मुखेडचीही आहे. येथे सरासरीच्या निम्मा पाऊस झालेला असल्याने येणाऱ्या काळात या दोन्ही तालुक्यांसह बिलोली, धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा जाणवू शकतात. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसह राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाला गती देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वर्धीतवेग कार्यक्रमाद्वारे नळाद्वारे पाणी पुरवठ्याच्या योजना याबरोबरच ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात. सद्य:स्थितीत यातील ८८ कामे प्रगतीपथावर असून उर्वरीत ४८ कामे लवकरच मार्गी लागतील, असे पाणी पुरवठा विभागातर्फे सांगितले जात आहे. या योजनांसाठी २०१७-१८ चा अखर्चित निधी ११ कोटी ६० लाख ७२ हजार इतका उपलब्ध आहे. याबरोबरच २०१८-१९ या वर्षासाठीचे १५ कोटी ५६ लाख २७ हजार मंजूर नियतव्यय आहे. सद्य:स्थितीत या विभागाकडे अखर्चित असलेला निधी उपलब््नध आहे. मात्र त्यातील ४ कोटी ११ लाख ४१ हजाराचा प्रत्यक्ष खर्च झाला असून अद्यापही या विभागाकडे ७ कोेटी ४९ लाख ३१ हजाराचा निधी शिल्लक आहे. या निधीतून पाणी पुरवठा विभागाने उर्वरीत कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून हातपंप, विद्युत पंप, देखभाल दुरुस्तीसह विंधन विहिरी तसेच कुपनलिकेवर विद्युत पंप बसविण्याची कामे सुरू आहेत. यातून ४० कामे पूर्ण होतील, असा विश्वास पाणी पुरवठा विभागाला वाटतो. तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ३० लाखांचे मंजूर नियतव्यय आहे. यातून ६० कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने निश्चित केले आहे. संभाव्य टंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून येणाºया उन्हाळ्याची वाट न पाहता उपलब्ध निधीतून हातावर असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
देखभाल दुरुस्तीवर द्यावा लागणार भर
ग्रामपंचायत प्रोत्साहनपर अनुदानातून घेतलेल्या विशेष दुरुस्तीसाठी सद्य:स्थितीत १ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध आहे तर प्रादेशिक नळ योजना देखभाल व दुरुस्तीसाठीही २० लाख रुपये या विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच हातपंप व विद्युत पंप दुरुस्ती पथकासाठी २ लाख, नळयोजनांच्या विद्युत मोटार दुरुस्ती व सुटेभाग खरेदीसाठी १५ लाख आणि जिल्हा परिषद उपकर योजनेतून अंतर्गत नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी ७० लाखाचा निधी या विभागाकडे आहे. वरील सर्व निधी सद्य:स्थितीत शिल्लक असल्याने दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यायला हवी. एकूणच पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती विशेष निधी म्हणून ७ कोटी ३४ लाख रुपये उपलब्ध आहेत. यातील केवळ १ कोटी ३१ लाख ७४ हजार देखभाल दुरुस्तीसाठी खर्च झालेले आहेत.

Web Title: What is the digging of a well after thirst?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.