VIDEO : क्रूर; माथेफिरूने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल ; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 04:08 PM2018-04-14T16:08:33+5:302018-04-14T16:08:33+5:30

शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

VIDEO: Cruel; psycho tied the dog to the bike; Video viral | VIDEO : क्रूर; माथेफिरूने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल ; व्हिडीओ व्हायरल

VIDEO : क्रूर; माथेफिरूने कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल ; व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्दे शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला इम्तियाज सय्यद असे या माथेफिरुचे नाव असून वाघी रस्त्यावर तो मोपेडच्या पाठीमागे साखळीने बांधलेल्या कुत्र्याला फरफटत नेत असल्याचे दिसून येत आहे़

नांदेड : शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. वजिराबादचे एक पथक या माथेफिरुच्या शोधात आहे़ 

इम्तियाज सय्यद असे या माथेफिरुचे नाव असून वाघी रस्त्यावर तो मोपेडच्या पाठीमागे साखळीने बांधलेल्या कुत्र्याला फरफटत नेत असल्याचे दिसून येत आहे़ रस्त्याने फरफटत नेताना श्वान जिवाच्या आकांताने ओरडत असून नागरीकांनीही बघ्याची भूमिका घेतली. बऱ्याच अंतरावर अशाप्रकारे कुत्र्याला फरफटत नेणाऱ्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे़ पोलिस अधीक्षक स्वतः अ‍ॅडमीन असलेल्या एका ग्रुपमध्ये तो व्हिडीओ शेअर झाला. तेव्हा त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी वजिराबाद पोलिसांनी सदरील माथेफिरुचा शोध घेवून कारवाईचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार वजिराबाद पोलिसांचे एक पथक वाघी परिसरात या माथेफिरुचा शोध घेत आहेत़ दरम्यान, हा व्हिडीओ कधीचा आहे हे मात्र नेमके स्पष्ट झाले नाही. 

Web Title: VIDEO: Cruel; psycho tied the dog to the bike; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.