एकाच रात्री सहा ठिकाणी चोरी; बाळापूरात चोरट्यांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:38 IST2017-12-12T16:27:58+5:302017-12-12T20:38:48+5:30

कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व्यापारपेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धूडगूस घातला. पेठेतील सहा दुकाने फोडून त्यांनी जवळपास ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

Stolen money n goods from six places in one night at aakhada balapur | एकाच रात्री सहा ठिकाणी चोरी; बाळापूरात चोरट्यांचा धुडगूस

एकाच रात्री सहा ठिकाणी चोरी; बाळापूरात चोरट्यांचा धुडगूस

हिंगोली :  कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व्यापारपेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धूडगूस घातला. पेठेतील सहा दुकाने फोडून त्यांनी जवळपास ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आखाडा बाळापुर येथील व्यापारी पेठेत काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पेठेतील सहा दुकांमध्ये त्यांनी मोडतोड केली. यात जवळपास ३ लाख ५५ हजार ५००रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी झालेल्या दुकानात सराफा दूकान, कृषि केंद्र, पानपट्टी व दोन अॉटोमोबाईल्स दुकानांचा समावेश आहे. तसेच चोरट्यांनी तेथील एका घरात सुद्धा चोरी केली. पोलिसांना यांची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी येत प्राथमिक चौकशी केली. तसेच पोलिसांनी अधिक माहिती जमा करत ठसे तज्ञांना बोलावत घटनास्थळावरून ठसे गोळा करण्याचे कार्य सुरु केले आहे. 

Web Title: Stolen money n goods from six places in one night at aakhada balapur

टॅग्स :Nandedनांदेड