महिला तलाठ्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:43 AM2018-03-14T00:43:40+5:302018-03-14T00:45:20+5:30

दहा वर्षापूर्वी झालेल्या फेरफाराची नोंद सातबारावर घेण्याच्या विषयावरुन कंधारचे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य तलाठी संघाच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे केली. तहसीलदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी तलाठ्यांनी काम बंद आंदोलनही केले.

Poor women traps | महिला तलाठ्यास शिवीगाळ

महिला तलाठ्यास शिवीगाळ

googlenewsNext
ठळक मुद्देकाम बंद आंदोलन : कंधारच्या प्रभारी तहसीलदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दहा वर्षापूर्वी झालेल्या फेरफाराची नोंद सातबारावर घेण्याच्या विषयावरुन कंधारचे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य तलाठी संघाच्यावतीने जिल्हाधिका-यांकडे केली. तहसीलदारांवर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी तलाठ्यांनी काम बंद आंदोलनही केले.
कंधार तालुक्यातील उमरज तलाठी सज्जाच्या तलाठी सुहास मुळजकर यांना १३ मार्च रोजी प्रभारी तहसीलदार चव्हाण यांनी एका फेरफार प्रकरणाची नोंद सातबाराला का घेतली नाही? याची विचारणा केली. त्यावेळी मुळजकर यांनी सदर प्रकरणात कलम १५५ नुसार आदेश मिळण्याकरिता प्रकरण दाखल केल्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या तहसीलदार चव्हाण यांनी महिला तलाठी मुळजकर यांना फोनवरुन शिवीगाळ केली. या घटनेचा राज्य तलाठी संघटनेच्या जिल्हा शाखेने निषेध केला. या प्रकरणी तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची संघटनेच्यावतीने भेट घेवून सदर प्रकार सांगितला.
यावेळी तलाठी संघाचे राज्य उपाध्यक्ष एम.एम. काकडे, एन.जी. कानगुले, उदयकुमार मिसाळे, प्रफुल्ल खंडागळे, मनोज देवणे, एच.जी. पठाण, कंधार तालुकाध्यक्ष मारोती कदम, अनिद्ध जोंधळे, आय.बी. मडगीलवार आदींची उपस्थिती होती.
याच फेरफार प्रकरणात प्रारंभी चव्हाण यांनी सातबारावर नोंद घेऊ नये, असे सांगितले होते. त्यानंतर मात्र नोंद घेण्यासाठी तलाठी मुळजकर यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.
उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशीचे आदेश
तलाठी संघटनेचे शिष्टमंडळ आले असता सदर प्रकाराची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. सदर प्रकरणी कंधार उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशीचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान संघटनेच्यावतीने बुधवारी संपूर्ण जिल्हाभरात काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे.
संभाषणाची आॅडीओ क्लिप झाली व्हायरल
प्रभारी तहसिलदार सारंग चव्हाण आणि तलाठी सुहास मुळजकर या दोघांमध्ये मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे़ या संभाषणा दरम्यान, तहसिलदार चव्हाण हे वारंवार तलाठी मुळजकर यांना अपमानास्पद वाटेल अशा शब्दाचा उच्चार करीत होते़ तर मुळजकर या मात्र त्यांना अदबीने बोलत होत्या़ संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर ती तलाठी संघाच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोहचली़ त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे़

Web Title: Poor women traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.