नरेगाच्या ९३ कामावर अवघे ९२२ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:20 AM2019-05-17T00:20:32+5:302019-05-17T00:21:29+5:30

जिल्ह्यात एकेकाळी रोहयो कामात अव्वल राहत दबदबा निर्माण करणारा तालुका म्हणून कंधार तालुका ओळखला जात होता. परंतु नरेगातंर्गत कामे, त्यावरील मजूर संख्या पहाता दबदबा ओसरला की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून २८ ग्रामपंचायतीतंर्गत ९३ कामावर अवघे अकुशल ९२२ मजूर असल्याचे समोर आले आहे.

Only 9 22 laborers are working at 9 of NREGA | नरेगाच्या ९३ कामावर अवघे ९२२ मजूर

नरेगाच्या ९३ कामावर अवघे ९२२ मजूर

Next

कंधार: जिल्ह्यात एकेकाळी रोहयो कामात अव्वल राहत दबदबा निर्माण करणारा तालुका म्हणून कंधार तालुका ओळखला जात होता. परंतु नरेगातंर्गत कामे, त्यावरील मजूर संख्या पहाता दबदबा ओसरला की काय? अशी शंका व्यक्त केली जात असून २८ ग्रामपंचायतीतंर्गत ९३ कामावर अवघे अकुशल ९२२ मजूर असल्याचे समोर आले आहे.
रोजगार हमी योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्य पातळीवर नांदेड जिल्ह्याने अमंलबजावणीत आपले मोठे योगदान देत आघाडी घेतली होती. त्यात कंधार तालुक्याने जिल्हा स्तरावर आपली स्वतंत्र ओळख अमंलबजावणीत निर्माण केली होती. नरेगाला सुरुवात झाल्यावर प्रारंभी तालुका योग्य वाटचाल करत राहिला. परंतु मजूरीचे कमी दर, अमंलबजावणीत यंत्रणेची उदासीनता तसेच मजूरांना ऊसतोडणी, वीटभट्टी, बांधकामावर मिळणाऱ्या जास्तीच्या अनामत रक्कमा व त्यातून होणारे पाल्याचे शिक्षण, विवाहाची खर्चिक कामे आदीमुळे मजूरानी फिरवलेली पाठ, घरकुल बांधकामासाठी होणारा रेतीचा तुटवडा आदीमुळे कामाची व मजूराची संख्या वाढविण्याचे आव्हान ठरत आहे.
१६ मे रोजीच्या अहवालामुळे नरेगाचे चित्र समोर आले आहे.वनविगागाच्या २ कामावर ३७ मजूर आहेत. ग्रामपंचायतीच्या ८७ कामावर सर्वाधिक ८३० मजूर असून सामाजिक वनीकरणाच्या ४ कामावर ५५ असे एकूण ९२२ मजूर कामावर आहेत. कृषी विभागाची कामे नसल्याने काम व मजूराचा आकडा घटला आहे.
किनवट तालुक्यात १६४ कामावर २ हजार ९३ मजूर, भोकर ता ८८ कामावर १ हजार ८२१, अधार्पूर ९१ कामावर १ हजार ३६३,लोहा ११५ कामावर १ हजार १५९, उमरी ७१ कामावर १ हजार ४१ मजूर कामावर आहेत. यानंतर कंधार तालुक्यातील कामे व मजूर संख्या आहे. जिल्ह्यात १४ हजार २४ अकुशल मजूर १ हजार १५८ कामावर आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता आवश्यतेनुसार कामे वाढविण्याची गरज आहे.
साधनांचा दुष्काळ
नरेगा संदर्भात मस्टर तयार करणे कामासह इतर कामे होतात. तेथे कामाकाजासाठी साहित्य व साधनाचा दुष्काळ आहे. नेट सुविधेचा लपंडाव, प्रिंटरची अपूरी सोय, कागदी रिम अल्प सोय असल्याने कामकाज करताना अडचणी येत आहेत.

Web Title: Only 9 22 laborers are working at 9 of NREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.