भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:34 AM2018-03-26T00:34:15+5:302018-03-26T00:34:15+5:30

लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.

Nomadic tribe is an integral component of Bahujan Samaj | भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

googlenewsNext
ठळक मुद्देसाहित्यिक मोरे : भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि चतुराई प्रतिष्ठान चुंचा यांच्या वतीने आयोजित भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलनात मोरे बोलत होते़
कुसुम सभागृह येथे आयोजित संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आ.़ डी.पी.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. गणेश शिंदे, संयोजक व कार्याध्यक्ष प्रा. गजानन लोमटे, कवी प्रा.महेश मोरे, प्रा.व्यंकटी पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे म्हणाले, हातात छिन्नी-हातोडा घेवून अजरामर शिल्पाकृती निर्माण करणारा, श्रम परीमार्जन करण्यासाठी समूहाने लोकसंगीत व लोककलांची निर्मिती करणारा अठरापगड जाती-जमातीत विभागलेला हा बहुजन समाजच संस्कृतीचा आणि कला-कौशल्यांचा वाहक आहे. राज्यात भटक्या-विमुक्त जमातींची संख्या ४३ असून त्यांच्यातील पोटजातींची संख्या दोनशेंवर आहे़ प्रत्येकाची बोलीभाषा भिन्न असून त्यांच्यातील वेगळेपण बोलताना जाणवते, असे मोरे यांनी सांगितले़
वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणी या जमाती मराठीचा वापर करतात. मराठी भाषेत शब्दसाठा वाढीबरोबरच मराठी साहित्य समृद्ध करण्यात या जमातींचा सहभाग महत्त्वपूर्ण असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मोरे यांनी म्हणाले़
आ.डी. पी. सावंत म्हणाले, कोणत्याही साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते जोपासले जाण्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले़ अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी गावकुसाबाहेरील व वाडी-तांड्यावरील भाषा मराठी साहित्याला कशा समृद्ध करत असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक संयोजक प्रा. गजानन लोमटे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर प्रा.डॉ.दीपाली लोमटे यांनी आभार मानले़ परिसंवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून मान्यवरांनी साहित्यावर विचामंथन केले.

Web Title: Nomadic tribe is an integral component of Bahujan Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.