नांदेडात शिवरायांचा जयघोष ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:53 AM2018-02-20T00:53:12+5:302018-02-20T00:53:29+5:30

नांदेड : ढोल-ताशांचा गजर आणि डफावर थाप देत शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडात शिवगर्जना दुमदुमली़ रयतेच्या राजाचा जयघोष करीत दुपारपासून सुरु झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या़ जिकडे-तिकडे खांद्यावर भगवा ध्वज घेवून सळसळत्या रक्ताची तरुणाई शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत होती़ त्यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ, मावळा ग्रूप, स्वराज्य मित्रमंडळ, लेबर कॉलनी छावा संघटना, कुणबी मराठा महासंघ आदींनी स्वतंत्रपणे मिरवणुका काढल्या.

 Nandedat Shivrajaya Jayanti ... | नांदेडात शिवरायांचा जयघोष ...

नांदेडात शिवरायांचा जयघोष ...

googlenewsNext

नांदेड : ढोल-ताशांचा गजर आणि डफावर थाप देत शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडात शिवगर्जना दुमदुमली़ रयतेच्या राजाचा जयघोष करीत दुपारपासून सुरु झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या़ जिकडे-तिकडे खांद्यावर भगवा ध्वज घेवून सळसळत्या रक्ताची तरुणाई शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत होती़ त्यामुळे अवघे वातावरण शिवमय झाले होते़ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ, मावळा ग्रूप, स्वराज्य मित्रमंडळ, लेबर कॉलनी छावा संघटना, कुणबी मराठा महासंघ आदींनी स्वतंत्रपणे मिरवणुका काढल्या.
‘मानिनी’ चा पुढाकार : ४५० जणांचा नेत्रदानाचा संकल्प
मानिनी मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित नेत्रदान शिवसंकल्प शिबिरात जवळपास साडेचारशे जणांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित शिबिरात सर्वांनी नोंदणी करून नेत्रदानाचे फॉर्म भरून दिले़
उद्घाटन डॉ़तेजस्विनी वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी डॉ़शीला कदम, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़ज्योती देशमुख, अरूंधती पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सदर उपक्रम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ़सारिका मोरे, डॉ़ अंजली आगळे, डॉ़स्मिता टेंगसे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला़ यावेळी डॉ़नम्रता तरोडेकर, डॉ़विद्या पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़डॉ़अंजली वागळे यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले़
यशस्वीतेसाठी डॉ़स्मिता कदम, डॉ़स्मिता गायकवाड, डॉ़सुनीता कदम, डॉ़वर्षा देशमुख, सुजाता बारडकर, प्रणिता वाघमारे, साधना तरोडेकर, डॉक़ल्पना देशमुख आदींनी सहकार्य केले़ शिबिरात ११ वर्षांचा मुलगा सौरभ देशमुखपासून ८० वर्षे वय असणाºया वृद्धांनीही नेत्रदान करण्याचा संकल्प केला़
प्रवीण साले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रण फॉर छत्रपती ड्रिम मॅरेथॉन स्पर्धेत युवक-युवतींनी सहभाग नोंदविला़ उद्घाटन भाजप महानगराध्यक्ष डॉ़संतुक हंबर्डे यांनी केले़ यावेळी शंतनु डोईफोडे, चैैतन्यबापू देशमुख, अरूंधती पुरंदरे, शीतल खांडिल, दीपकसिंह ठाकूर, डॉ़बालाजी गिरगावकर, कुणाल गजभारे, सुरेश जोंधळे, हास्सेवाड, राष्ट्रपाल पांडागळे आदी उपस्थित होते़ स्पर्धेत मुलींमधून प्रथम भारती दुधे, द्वितीय आरती दुधे, तृतीय कीर्ती, मुलांमधून प्रथम संजय झाकणे, द्वितीय किरण मात्रे, तृतीय क्रमांक विनोद हेगडे यांनी पटकावला़

देखाव्यातून शेतक-यांचे प्रश्न आणले ऐरणीवर
मिरवणुकांमध्ये सामाजिक संदेश देणारे देखावे लक्ष वेधून घेत होते़ महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांच्या वतीने चित्ररथ काढण्यात आला़ यामध्ये शिवकाळातील बळीराजा आणि सद्य:स्थितीतील शेतकºयांची अवस्था दाखविण्याचा प्रयत्न केला़ या रॅलीत जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, संजय कदम, देवीदास गायकवाड, गजानन कहाळेकर, डॉ़ भोसले, उत्तम क्षीरसागर, राजश्री मुळे, विजया लुंगारे, अंजना जाधव तर छावाने काढलेल्या मिरवणुकीत स्वराज्य ढोल पथकाच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता़ यावेळी तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे, दशरथ कपाटे, पंकज उबाळे, स्वप्निल पाटील रातोळीकर, नितीन गिरडे, दीपक तुडमे, प्रताप कदम, शंकर जाधव,अंगद पाटील आदींचा सहभाग होता़

ढोल-ताशा
मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचे आकर्षण पहायला मिळाले़ मिरवणुकांमध्ये एकही डीजे नव्हता, हे विशेष! कोल्हापूर, पुण्यातील ढोलपथकांना फिके पाडेल अशा प्रकारचा ढोल-ताशांचा गजर नांदेडकरांना अनुभवायला मिळाला़ एका पायावर उडी मारत ढोल वाजवून, भगवा ध्वज उंचावत जयजयकार केला़

लेझीम पथक
मुख्य मिरवणुकीत महात्मा फुले शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाच्या सादरीकरणाने सर्वांची वाहवा मिळविली़ यामध्ये सहभागी मुलींकडून लेझीमचे कौतुकास्पद सादरीकरण झाले़ शेतकरी गीतांचा निनाद लेझीम पथकाने आपल्या कलेतून उपस्थितांसमोर मांडला़ आयटीआय चौक येथील सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली़

Web Title:  Nandedat Shivrajaya Jayanti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.