नांदेड जिल्ह्यातील सातशेवर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:54 AM2018-06-02T00:54:56+5:302018-06-02T00:54:56+5:30

पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५७ सपोउपनि समावेश आहे़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांच्या समन्वयाने बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते़

Nanded district transfer officers, officers | नांदेड जिल्ह्यातील सातशेवर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नांदेड जिल्ह्यातील सातशेवर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५७ सपोउपनि समावेश आहे़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांच्या समन्वयाने बदल्या करण्यात आल्या़ त्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते़
स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळ्या ठाण्यांची जबाबदारी सांभाळणाºया काही पोलीस निरीक्षकांच्या यापूर्वीच जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांची जम्बो यादी प्रकाशित करण्यात आली़ त्यात पोनि़विठ्ठल चव्हाण यांना परभणीला पाठविण्यात आले आहे़
त्याचबरोबर संदीपान शेळके-परभणी, अंगद सुडके-हिंगोली, सुरेश दळवे-परभणी, अरुण जगताप-हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे़ तर दादाहरी चौरे, रवींद्र बोरसे, लक्ष्मण राख व मधुकर कारेगावकर हे पोलीस निरीक्षक इतर जिल्ह्यांतून नांदेडला येणार आहेत़ यंदा पहिल्यांदाच पोलीस कर्मचाºयांसाठी समन्वयाने बदल्यांची संकल्पना राबविण्यात आली़ त्यामध्ये एकाच ठिकाणी कार्यकाळ पूर्ण करणाºया ६१३ पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता़ कर्मचाºयांची बदल्यांच्या वेळची मानसिकता लक्षात घेवून त्यांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी बदलीसाठी समन्वय राखण्यात आला़
---
सपोनि ओमकांत चिंचोलकर हिंगोलीला
पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेत धडाकेबाज कामगिरी करणारे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांची हिंगोलीला बदली झाली आहे़ तीन ते चार महिन्यांच्या काळात सपोनि चिंचोलकर यांनी विशेष पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात अवैध धंदे करणाºयांना सळो की पळो करुन सोडले होते़ कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ परंतु, मध्यंतरी स्थागुशाचे पोनि़संदीप गुरमे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर सपोनि चिंचोलकर यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले होते़ त्यानंतर काही दिवसांत गुरमे यांची रवानगीही पोलीस अधीक्षक मीना यांनी नियंत्रण कक्षात केली होती़ काही दिवसांपूर्वीच गुरमे यांची औरंगाबाद बदली झाली असून आता चिंचोलकर यांना हिंगोलीला पाठविण्यात आले़
---
कोणाला मुदतवाढ तर कोणाच्या बदलीला स्थगिती
पोउपनि अमोल कडू, सुशीलकुमार चव्हाण, मिर्झा अन्वर मिर्झा इब्राहिम बेग, सय्यद मोईनोद्दीन, म़इब्राहिम, मारोती चव्हाण, मधुकर वाघमारे, सदाशिव सूर्यतळे, बापूराव पवार, बाबू खेडकर, गंगाधर लष्करे, माधव झडते, व्यंकटी एडके, वैभव नेटके, परशुराम मराडे, अमृता बोरचाटे, श्रीदेवी पाटील, शीतल चव्हाण, विनायक शेळके, मनोजकुमार पांडे, किरण पठारे, अनिता चव्हाण, व्यंकट भारती या पोलीस उपनिरीक्षकांना एक वर्ष मुदतवाढ किंवा बदलीला स्थगिती देण्यात आली आहे़ दरम्यान, पोलीस दलातील आणखीही काही अधिकारी ठाणे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत़

 

Web Title: Nanded district transfer officers, officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.