lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:28 PM2019-03-19T20:28:46+5:302019-03-19T20:29:40+5:30

काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपानेही सबुरीची रणनीती आखली आहे.

Lok sabha election 2019: There was a suspense of candidacy from the BJP along with Congress for Nanded constituency | lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

Next

- विशाल सोनटक्के 

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससहभाजपाचाही उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवाराविनाच प्रचार सुरु केला असला तरी उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. १९७७ मध्ये शेकाप आणि त्यानंतर एकदा भाजपा अशा दोन निवडणुका सोडल्या तर सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील निवडणुकीत भाजपाची मोदी लाट असतानाही नांदेड लोकसभेतून अशोकराव चव्हाण हे सुमारे ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा निवडणूक प्रचाराला लागले आहेत. खा. अशोकराव चव्हाण यांनी लोकसभेऐवजी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून लोकसभेसाठी आ. अमिता चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. तसा प्रस्तावही जिल्हा काँग्रेसने पक्षश्रेष्ठीकडे सादर केला आहे. मात्र ऐन वेळी खा. चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपानेही सबुरीची रणनीती आखली आहे. भाजपाकडून लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र आ. अमिता चव्हाण निवडणूक रिंगणात उतरल्यास भाजपाकडून जिल्हा परिषद सदस्या मीनल खतगावकर यांना मैदानात आणले जाऊ शकते.  

प्रमुख पक्षांच्या प्रचाराला वेग
काँग्रेसकडून अशोक चव्हाण की अमिता चव्हाण आणि भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर की अन्य कोणी, असा प्रश्न असला तरी या दोन्ही पक्षांनी उमेदवारी  जाहीर होण्याची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही  वाड्या, वस्त्यांवर मतदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्या आहेत. 

Web Title: Lok sabha election 2019: There was a suspense of candidacy from the BJP along with Congress for Nanded constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.