लावणी महोत्सव फटकेबाजीने रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:08 AM2019-01-08T00:08:50+5:302019-01-08T00:09:48+5:30

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत सोमवारी झालेल्या लावणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़ अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती़

The lavani festival was painted with flute | लावणी महोत्सव फटकेबाजीने रंगला

लावणी महोत्सव फटकेबाजीने रंगला

googlenewsNext
ठळक मुद्देचिखलीकर-सत्तार : उद्घाटनावेळी राजकीय टोलेबाजी

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत सोमवारी झालेल्या लावणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़ अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती़ घोड्याचा लगाम कुणाच्या हाती? या वक्तव्यावरुन उपस्थितांचेही चांगलेच मनोरंजन झाले़
आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी उद्घाटनपर बोलताना यात्रेच्या वैभवाला स्व. विलासराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुखांना जिल्हा परिषदेचे निमंत्रित करायला हवे होते. तसेच यात्रेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे आलेले होते. त्यांना ही आजच्या लावणी महोत्सवाला निमंत्रित करायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली़
या यात्रेत स्व. विलासराव देशमुख,स्व.गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, फौजिया खान यांचे घोडे येतात. अशी आठवणही प्रताप पाटील चिखलीकर यांनी काढली. माळेगाव यात्रेच्या वैभवासाठी स्व. विलासराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच ही यात्रा देशाच्या नकाशावर आली.
यात्रेच्या लावणी महोत्सवासाठी माजीमंत्री दिलीपराव देशमुख यात्रेत असतानाही त्यांना निमंत्रित करण्याचा मनाचा मोठेपणा जिल्हा परिषदेने दाखविला नाही. त्यांना तसे आदेश नसावेत. लातूरच्या काँग्रेस नेतृत्वाचे फोटो सोयीनुसार नांदेडकर लावतात, अशी टीका आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली.
तोच धागा पकडून बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, की माळेगावात घोडे अनेकांचे येतात;पण मराठवाड्यातील घोड्यांची लगाम ही अशोक चव्हाण यांच्या हातात आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर ही जोरदार प्रहार चढविला. बोेंडअळी अनुदान व कर्जमाफीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला.
उद्घाटनानंतर तुमच्यासाठी काय पण... योगेश देशमुख पुणे, बबन मीरा पडसळीकर पदमावती कला केंद्र मोडनिमच्या श्यामल सुनीता लखनगावकर संच, आशा रुपा परभणीकर कलासंच, शाहीर प्रेमकुमार मस्के संच, अनुराधा नांदेडकर या संचाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर यांनी केले तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी आभार मानले.
घोड्यांच्या चालीसाठी गुजरात, बारामतीचे निरीक्षक
माळेगावचा घोडेबाजार देशाच्या नकाशावर आलेला, असून यंदा प्रथमच कुस्तीच्या मैदानावर अश्वांच्या कवायतीचे आयोजन करण्यात आले होते़ अप्रतिम कवायती व घोड्यांच्या चाली पाहण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी झाली होती. काँग्रेसचे धिरज देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या घोड्यांच्या कवायतीचे निरीक्षण करायला निरीक्षक म्हणून बारामती व गुजरातचे परीक्षक होते. यावेळी राज्यभरातील ६५ अश्वांनी यात सहभाग नोंदविला होता.
आज पारंपरिक लोककला महोत्सव
माळेगाव यात्रेचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून आज पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पारंपरिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माजी आ़ रोहिदास चव्हाण, माजी आ़ हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, दत्तात्रय रेड्डी, सभापती मधुमती राजेश देशमुख, शीलाताई निखाते, सतीश संभाजी पाटील उमरेकर यांची उपस्थिती राहणार आहे़

Web Title: The lavani festival was painted with flute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.