ट्रक अडवून दरोडा टाकणारे चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:10 AM2019-06-19T00:10:08+5:302019-06-19T00:11:26+5:30

नांदेड रस्त्यावरील सीताखांडी शिवारात सहा दरोडेखोरांनी एका ट्रकला अडवून चालकास धारदार शस्त्राने मारहाण करीत लुटून पोबारा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दोघे फरार झाल्याची थरारक घटना मंगळवारी पहाटे घडली.

Four theft arrested who'sdetained truck | ट्रक अडवून दरोडा टाकणारे चौघे अटकेत

ट्रक अडवून दरोडा टाकणारे चौघे अटकेत

Next

भोकर : नांदेड रस्त्यावरील सीताखांडी शिवारात सहा दरोडेखोरांनी एका ट्रकला अडवून चालकास धारदार शस्त्राने मारहाण करीत लुटून पोबारा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दोघे फरार झाल्याची थरारक घटना मंगळवारी पहाटे घडली.
दरम्यान, नांदेडहूून येणाºया एका चारचाकी वाहनातील किनवट तालुक्यातील बोधडी येथील प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी जखमी ट्रकचालकाची चौकशी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्या प्रवाशांनी ट्रकचालकासह भोकर पोलीस ठाणे गाठले. कर्तव्यावर हजर पोहेकॉ सुरेश श्रीमंगले, सुनील कांबळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा दोन दुचाकीवर दरोडेखोर भोकरकडे येताना दिसून आले.
पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यातील एक मोटार- सायकल शहरातील ओम लॉन्स जवळ घसरली. यात दुचाकीस्वार पळाला तर मागे बसलेले दोघे पळ काढीत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी यातील एका दरोडेखोरास बोरगाव येथून सकाळी ताब्यात घेतले तर चौथ्या दरोडेखोरास नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले. अन्य दोन दरोडेखोरांचा पोलीस तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेले दरोडेखोर रामेश्वर बालाजी बल्लोड, गोपीनाथ गोविंदराव शेळके (दोघे रा. बोरगाव नागरी ता. मुदखेड), ज्ञानेश्वर लिंबाजी लेंडगे (रा.कलमुला ता.पूर्णा जि.परभणी), संकेत बालाजी चव्हाण (रा. हनुमानगढ, नांदेड). या चौघांना अटक करुन फरार झालेल्या दरोडेखोरासह ६ जणांविरुद्ध भोकर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील अटक करण्यात आलेल्या चौघांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत.

  • फिर्यादी ट्रकचालक पुनया कुटुंबराव मंगलपुडी (रा.जिजुर मंडळ यरुपवाड, ता. नंदीगाव जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश) ट्रक (क्र. एपी-३९- यु ५३६९) विशाखापट्टणम येथून भोकरमार्गे गुजरातला आॅईलचे कॅन घेवून जाताना सीताखांडी शिवारात २ मोटारसायकल (क्र, एमएच २६ १५०१ व एमएच २६-४६११) वरुन आलेल्या ६ दरोडेखोरांनी ट्रकला अडवून चालकास तलवार व जांबीयाने मारहाण करुन जखमी करुन त्यांच्याकडील ६ हजार रुपये लुटून पळ काढला.

Web Title: Four theft arrested who'sdetained truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.