उमरी येथे सततची नापिकी व कर्जाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 06:48 PM2017-12-09T18:48:46+5:302017-12-09T18:49:41+5:30

सततची नापिकी व कर्जाची परतफेड झाली नसल्याने उमरी तालुक्यातील तुराटी येथील शेतक-याने स्वतःस पेटवून घेऊन आत्महत्या केली. नामदेव मारोती काळेकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. 

The farmer's suicide by bothering a continuous napiki and debt in Umri | उमरी येथे सततची नापिकी व कर्जाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या 

उमरी येथे सततची नापिकी व कर्जाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या 

googlenewsNext

नांदेड : सततची नापिकी व कर्जाची परतफेड झाली नसल्याने उमरी तालुक्यातील तुराटी येथील शेतक-याने स्वतःस पेटवून घेऊन आत्महत्या केली. नामदेव मारोती काळेकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, नामदेव काळेकर हे शेतकरी मागील काही दिवसांपासूनची नापिकीमुळे त्रस्त होते. यातच त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज होते. याची परतफेड झाली नसल्याने व शेतीमधून उत्पन्न होत नसल्यान नामदेव यांनी नैराश्यातून २ डिसेंबर रोजी स्वतः ला पेटवून घेतले. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. 

त्यांच्यावर नांदेड उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच ६ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. शेतामध्ये सततची नापिकी व बँकेकडून  घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नव्हती . या नैराश्यातून नामदेव काळेकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपनिरीक्षक शहदेव खेडकर यांनी दिली. याबाबत उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची  नोंद करण्यात आली . पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: The farmer's suicide by bothering a continuous napiki and debt in Umri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.