चोरंब्याच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, जिल्हा परिषदेत भरवली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:52 AM2019-02-13T00:52:13+5:302019-02-13T00:53:52+5:30

शाळेत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चोरंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा भरविली़ विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते़

Chorambadi students' rally, organized at Zilla Parishad | चोरंब्याच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, जिल्हा परिषदेत भरवली शाळा

चोरंब्याच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, जिल्हा परिषदेत भरवली शाळा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आंदोलनाने वेधले लक्ष दीड वर्षांपूर्वी शाळेची इमारत पडलीनवीन वर्गखोल्यांची मागणी

नांदेड : शाळेत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चोरंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा भरविली़ विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते़
मागील दीड वर्षांपासून जिल्हा परिषद, शाळा चोरंबा येथील शाळेची इमारत पडली आहे़ याबाबत शाळा प्रशासनाने इमारतीचे बांधकाम करुन देण्याबाबत वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधला़ परंतु, जिल्हा परिषदेकडून त्यांच्या मागण्यांबाबत दुर्लक्ष करण्यात येत होते़ या ठिकाणी शाळेचे बांधकाम हे चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले होते़ तसेच विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधाही नाहीत़
शाळेला इमारतच नसल्यामुळे शाळेसमारील मोकळ्या जागेवरच या चिमुकल्या विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत होते़ त्यामुळे संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी नांदेड गाठले़ सुरुवातीला त्यांनी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला़ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आम्हाला वर्गखोल्या द्या अशा घोषणा दिल्या होत्या़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आलेल्या या विद्यार्थ्यांनी त्याच ठिकाणी शाळा भरविली़ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हदगाव तालुक्याकडे असतानाही विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ येत आहे़ याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली़

Web Title: Chorambadi students' rally, organized at Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.